महाबीजद्वारे दोन लाख क्विंटल हरभरा बियाणांची तजवीज!

By admin | Published: October 16, 2016 02:36 AM2016-10-16T02:36:30+5:302016-10-16T02:36:30+5:30

शेतक-यांना मिळणार अनुदानावर बियाणे.

Mahabaj's contribution of two lakh quintals of green seeds! | महाबीजद्वारे दोन लाख क्विंटल हरभरा बियाणांची तजवीज!

महाबीजद्वारे दोन लाख क्विंटल हरभरा बियाणांची तजवीज!

Next

प्रवीण परदेशी : भरतवाडा, पारडी, पुनापूरची पाहणी
नागपूर : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागाचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यास महापालिकेने सुरुवात केली असून डिसेंबर २०१६ पर्यंत तो तयार होईल. नव्या वर्षात २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती प्रधान सचिव व स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली.
भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील ९५१ एकर जमिनीवर रस्ते, गडरलाईन, बगीचा व अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. प्रवीण परदेशी यांनी शनिवारी या भागाची पाहणी केली. आमदार कृष्णा खोपडे त्यांच्यासोबत होते. परदेशी यांनी या परिसरातील उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. आ. खोपडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात काही सूचना के ल्या.
यानंतर भवानी मंदिर येथील हॉलमध्ये प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाला तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, अपर आयुक्त रामनाथ सोनवणे यांनीही प्रस्तावित प्रकल्पाविषयी माहिती दिली.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १००२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यात केंद्र, राज्य सरकारतर्फे अनुक्रमे ५० व २५ टक्के अनुदान मिळणार आहे. महापालिकेचा २५ टक्के वाटा नासुप्र देणार आहे. याबाबतचे दिशानिर्देश यापूर्वीच राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहरे, प्रवीण पोहाणे, अनिता वानखेडे, पाडुरंग मेहर, मुन्ना पटले, चक्रधर अतकर, रवी मस्के , राजू दिवटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Mahabaj's contribution of two lakh quintals of green seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.