रिक्त पदभरतीसाठी महाबँकचे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:29+5:302021-09-12T04:23:29+5:30
बँकांच्या ६४५ शाखांमध्ये शिपाई नाहीत. ३६० शाखांमध्ये सफाई कर्मचारी नाहीत. सफाई कर्मचारी व शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत. ...
बँकांच्या ६४५ शाखांमध्ये शिपाई नाहीत. ३६० शाखांमध्ये सफाई कर्मचारी नाहीत. सफाई कर्मचारी व शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत. याचा बॅंकेच्या ग्राहकसेवेवर परिणाम होत आहे. बँकेचा व्यवसाय वाढला, तर दुसरीकडे मृत्यू, सेवानिवृत्ती, पदोन्नती, स्वेच्छा निवृत्ती, यामुळे रिक्त झालेल्या लिपिकांच्या जागा भरलेल्या नाहीत. सरकारकडून जनधन योजना राबविली जाते. पेन्शन, आधार, अनुदान वाटप ही सगळी कामे बॅंकेतूनच सुरू आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे ग्राहकसेवा देताना बँकांना अडचणी येत असल्याचे माईणखर यांनी सांगितले. संघटनेशी केलेले करार धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व प्रश्नांवर व्यवस्थापन एकतर्फी निर्णय घेत असल्याने, ७ सप्टेंबरपासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत बॅंकेच्या चेअरमन यांना ई-मेलद्वारे आवाहन पत्र पाठविण्यात येणार आहे, तसेच १५ सप्टेंबर रोजी झोनल कार्यालयापुढे धरणे दिले जाणार आहेत. २२ सप्टेंबर रोजी बॅंकेचे मुख्यालय पुणे येथे महाधरणे दिले जाईल. आंदोलनामध्ये प्रवीण महाजन, घिर्णिकर, अतुल वर्मा, श्याम वानखडे, जितेंद्र येळमे, अविनाश आखरे, सतीश धुमाळे, प्रवीण राठोड, योगेश थोरात, विशाल नळकांडे, योगेश अढाऊ, सचिन क्षीरसागर, किशोर ओहेकर, विनोद देशमुख, गजानन शिंदे, दीपक पुंडकर, भाग्यश्री जोशी, रामेश्वर बगाडे, चैतन्य राजूरकर, संदीप विधाते, प्रशांत शेळके, प्रवीण गावंडे, श्रीकांत ढोले, राजेश लहासे, अनिल मावळे, अनिल बेलोकार, सुदर्शन सोनोने आदी संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
२१ पासून लाक्षणिक संप
महाबँकेचा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय लाक्षणिक संप असणार आहे. संपादरम्यान बँकेचे कर्मचारी नोकर भरतीसाठी निदर्शने देणार आहेत, तसेच २७ सप्टेंबर रोजी महाबँकेतील सर्व कर्मचारी एक दिवसीय संप पुकारणार आहेत.