महाबीज बिजोत्पादकांना देणार बोनस!

By Admin | Published: January 6, 2016 02:01 AM2016-01-06T02:01:18+5:302016-01-06T02:01:18+5:30

अकोल्यात सौरऊज्रेवरील वातानुकूलित बियाणे भांडारही महाबीज उभारणार आहे.

Mahabeej Bijoyadakadara to give bonus! | महाबीज बिजोत्पादकांना देणार बोनस!

महाबीज बिजोत्पादकांना देणार बोनस!

googlenewsNext

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) त्यांच्याशी संलग्न बिजोत्पादक शेतकर्‍यांना सोयाबीन, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी यावर्षी बोनस देणार आहे. याशिवाय बिजोत्पादन कार्यक्रमातून निर्मित बियाण्यांची साठवणूक करण्यासाठी अकोल्यात सौरऊज्रेवरील वातानुकूलित बियाणे भांडारही महाबीज उभारणार आहे. सहाशे कोटींच्या वर वार्षिक उलाढाल असलेल्या महाबीजची २0१४-१५ या आर्थिक वर्षात ४४५ कोटी रुपये उलाढाल झाली. असे असले तरी महाबीजला २७ कोटींचा नफा मिळाला आहे. महाबीजचे राज्यात सहा हजार भागधारक असून, या नफ्यातून भागधारक शेतकर्‍यांना त्यांच्या समभागाच्या १0 टक्के लाभांश दिला जाणार आहे. तद्वतच सहा हजार भागधारकांमधील दोन हजार बिजोत्पादक शेतकर्‍यांना पिक ावर प्रतिक्विंटल बोनस देण्यात येणार आहे. यामध्ये तूर, मूग आणि उडीद या पिकांना प्रतिक्ंिंवटल ४00, तर सोयाबीन पिकाला प्रतिक्विंटल ५0 रुपये बोनस दिला जाणार आहे. महाबीजचे जे बिजोत्पादक शेतकरी आहेत, त्यांना त्यांच्या समभागाच्या दीडपट बियाणाचे कूपन दिले जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाबीजला २५ कोटी ९३ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी बहुतांश म्हणजे २0 कोटी ३८ लाख रुपये बिजोत्पादन कार्यक्रमावर खर्च केला जाणार आहे. शेतकर्‍यांनी स्वत: दज्रेदार बियाणांची निर्मिती करावी हा यामागील उद्देश असून, या उपक्रमाला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बिजोत्पादन कार्यक्रमातून निर्मित बियाण्यांची साठवणूक करण्यासाठी अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत सौरऊज्रेवरील वातानुकूलित गोदाम बांधण्यात येणार आहे. या गोदामावर १ कोटी ८0 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, असेच गोदाम भुसावळ येथेही बांधले जाणार आहे. महाबीजच्या सहा हजार भागधारकांपैकी दोन हजार भागधारकांनी बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला आहे. महाबीजने बिजोत्पादन कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याने इतर कृषी संस्थादेखील बिजोत्पादनाच्या कार्यक्रमावर भर देत आहेत.

Web Title: Mahabeej Bijoyadakadara to give bonus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.