महाबीज आणणार नवे कापसाचे बोलगार्ड वाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 03:34 PM2020-03-15T15:34:19+5:302020-03-15T15:34:26+5:30
एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण शेतकºयांना उपलब्ध करू न देणार आहे.
अकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकेव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने विकसित केले असून, आता संकरित कपाशी एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध करू न देणार आहे. बोंडअळ््यांचा प्रादुर्भाव रोखण्यास या वाणामुळे मदत होणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार महाबीज आणि स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी करण्यात आला.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही हायब्रीड-२ तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय बदल करू न महाबीजने बीटी कापूस विकसित केला. बोंडअळी व रस शोषण करणाºया किडींना प्रतिकारक्षम हे वाण गतवर्षी शेतकऱ्यांना उपलब्ध करू न देण्यता आले आहे. आता नव्याने संकरित कपाशी एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण शेतकºयांना उपलब्ध करू न देणार आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने कृषी क्षेत्रात कार्य करणाºया सार्वजनिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या दोन्ही संस्थांनी या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, वनाकृमीचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कापूस संशोधक डॉ. के. एस. बेग यांची उपस्थिती होती.
संकरित कपाशी एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण शेतकºयांना उपलब्ध करू न देणार आहे. यामुळे बोंडअळ््यांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. हे दोन्ही वाण २०२२ मध्ये शेतकºयांना उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत.
- अनिल भंडारी,
व्यवस्थापकीय संचालक,
महाबीज, अकोला.