महाबीज यावर्षी ६० हजार कपाशी बियाणे पाकिटे आणणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 10:22 AM2020-04-06T10:22:10+5:302020-04-06T10:22:25+5:30

डॉ. पंजाबराव देशमुुख कृषी विद्यापीठाच्या पीकेव्ही-२ व्हेरायटीत संशोेधन करू न बीजी-२ जीन्स टाकण्यात आला आहे.

Mahabeej this year will bring 60,000 cotton seed packets! | महाबीज यावर्षी ६० हजार कपाशी बियाणे पाकिटे आणणार!

महाबीज यावर्षी ६० हजार कपाशी बियाणे पाकिटे आणणार!

Next

अकोला: महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळ यावर्षी बीटी कपाशीची ६० हजार पाकिटे बाजारात उपलब्ध करणार आहे; परंतु ही सर्व पाकिटे नांदेड-४४ असतील. महाबीजने गतवर्षी ४० हजार बीजी-२ कपाशीची पाकिटे बाजारात आणली होती. शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. डॉ. पंजाबराव देशमुुख कृषी विद्यापीठाच्या पीकेव्ही-२ व्हेरायटीत संशोेधन करू न बीजी-२ जीन्स टाकण्यात आला आहे. तसेच स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशोधन करू न बीजी-२ कपाशीचे बियाणे निर्माण करण्यात आले आहे. गतवर्षी अशी सर्व ४० हजार पाकिटे महाबीजने बाजारात आणली होती. यावर्षी केवळ नांदेड-४४ हीच पाकिटे उपलब्ध करण्यात येणार आहेत. दरम्यान, यावर्षी महाबीज आणि स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने बीजी-२ कपाशी निर्मितीसाठी सामंजस्य करार केला असून, एक ते दोन वर्षांत हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करू न दिले जाणार आहे. नांदेड-४४ ही लोकप्रिय कपाशीची जात आहे. बीटी कपाशीचे बियाणे बाजारात येण्याआधी नांदेड-४४ कपाशीची जात शेतकरी पेरणी करीत होते. यावर्षी कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी देशात ‘लॉकडाऊन’ आहे. यातून बाहेर निघताच, ही बियाणे बाजारात उपलब्ध करू न दिली जाणार आहेत.

गतवर्षी ४० हजार कपाशी बियाण्यांंची पाकिटे बाजारात उपलब्ध करण्यात आली होेती. यावर्षी नांदेड-४४ ची ६० हजार पाकिटे बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहेत.
- प्रफुल्ल लहाने, महाव्यवस्थापक, महाबीज, अकोेला.

 

Web Title: Mahabeej this year will bring 60,000 cotton seed packets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.