कृषी केंद्र संचालकांच्या पवित्र्याने महाबीजला धसका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:35 AM2017-09-07T01:35:14+5:302017-09-07T01:35:27+5:30
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्यांना अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली. त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा िपटणार्या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ जवळ आल्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्यांना अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच महाबीजच्या संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात धाव घेत कारवाईबाबतची माहिती घेतली. त्यामुळे आधी काहीच झाले नसल्याचा डांगोरा िपटणार्या महाबीज यंत्रणेला तोंडावर पडण्याची वेळ जवळ आल्याची चिन्हे आहेत.
हरभरा घोटाळ्यात काहीच निष्पन्न न झाल्याचा पवित्रा, आधी महाबीजनेही घेतला होता. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही कारवाईस टाळाटाळ करीत फाइल बंद करण्याची तयारी केली होती. त्याचवेळी विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकांनी घोटाळ्यातील काळाबाजार उघड केला. त्यातून अकोला शहरातील चार बड्या वितरकांसह जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र संचालक कारवाईच्या रडारवर आले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी जवळपास १४६ केंद्र संचालकांना नोटीस बजावल्या. त्यांचे खुलासे प्राप्त होत आहेत. त्यामध्ये अनेकांनी हरभरा बियाण्याचा घोटाळा होण्यास महाबीज जबाबदार असल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे आता या प्रकरणा त महाबीजने मुद्दामपणे केलेल्या हलगर्जीपणाचे पि तळ उघडे पडणार आहे.
महाबीजने केली होती थातूरमातूर कारवाई
हजारो क्विंटल अनुदानित हरभरा बियाण्यातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटणारे वितरक, कृषी सेवा केंद्र संचालकांची त्याचवेळी इमानेइतबारे झाडाझडती घेतली असती, तर त्याचवेळी या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असता; मात्र ती तत्परता न दाखविता दिखाव्यासाठी थातूरमातूर कारवाई करीत चार वितरकांचे परवाने काही महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. जूनच्या सुरुवातीला खरीप हंगाम सुरू होताच, त्यांना वितरकाचा दर्जा कायम करण्यात आला. त्यामुळे महाबीजची चौकशी, कारवाई आणि हेतूबद्दलही शंका निर्माण होत आहेत.
-