शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी! - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 06:25 PM2019-08-06T18:25:18+5:302019-08-06T18:52:51+5:30

मूर्तिजापूर : शासनाने सुरु केलेली पिक कर्ज माफी योजना जो पर्यंत शेवटचा शेतकरी पुर्ण कर्ज मुक्त होत नाही तोपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथे केले.

Mahajanesh Yatra - Chief Minister to give account to the people | शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी! - मुख्यमंत्री

शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी! - मुख्यमंत्री

Next

मूर्तिजापूर : शासनाने सुरु केलेली पिक कर्ज माफी योजना जो पर्यंत शेवटचा शेतकरी पुर्ण कर्ज मुक्त होत नाही तोपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथे केले. ते येथील ६ आॅगस्ट रोजी  महाजनाआदेश यात्रेनिमित्त जमलेल्या समुदाया समोर बोलत होते.
 ते  पुढे म्हणाले की, आतापर्यंत आपण अनेक देवांच्या यात्रा बघितल्या परंतू ही यात्रा खºया देवाची म्हणजे जनतेची, मतदारराजाची आहे.या निमित्ताने मी तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी तुमच्या पर्यंत पोहोचलो आहे. ही सरकार बेदाग असून संपूर्णपणे पारदर्शक आहे. आम्ही पाच वर्षाच्या काळात कोणत्याही संस्था तथा आमचे साम्राज्य उभे केले नाही. आम्ही पाच वर्षांत शेतकºयांसाठी ५० हजार कोटी रुपये खर्च केले. म्हणजे पाच वर्षांत १० हजार कोटी रुपये दिले. त्यांनी पंधरा वर्षांत केवळ २० हजार कोटी दिले. दिल्याचे सांगत तत्कालीन सरकारचा समाचार घेतला. खºया अर्थाने आमचे सरकार शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असुन शेतकºयांना काळजी करण्याचे कारण नाही अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.जनतेचा सेवक म्हणून लोकशाहीतील मालक जनता जनार्दनाला कामकाजाचा हिशेब देणे कर्तव्य असल्यामुळे महाजनादेश यात्रा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
 यावेळी ना. डॉ. रणजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना बॅरेजचा प्रश्न उपस्थित केला. बॅरेजचे  काम पुर्णत्वास गेले तर  शेतकºयांना सिंचनासाठी उपयोग होईल. असे सांगत मुख्यमंत्र्यांचे रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला ना. संजय कुटे, ना. रणजीत पाटील, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. अमित कावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

'प्रहार' कार्यकर्त्यांना केले पोलीसांनी स्थानबद्ध
 प्रहार पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन घोषणाबाजी करणार असल्याची  कुणकुण पोलीसांना लागली असता कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलीसांनी त्यांना स्थानबद्ध केले. यामध्ये तालुका अध्यक्ष संतोष इंगोले, शहर अध्यक्ष सागर फुंडकर, अमोल वानखडे, अंकुश हरणे, पुरुषोत्तम ठोकळ यांचा समावेश आहे. 

Web Title: Mahajanesh Yatra - Chief Minister to give account to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.