महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान; कृषी कायद्यांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:22+5:302020-12-09T04:14:22+5:30
प्रमुख वक्ते म्हणून अक्षय राऊत उपस्थित होते. यावेळी अक्षय राऊत यांनी, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले. आंबेडकरांच्या ...
प्रमुख वक्ते म्हणून अक्षय राऊत उपस्थित होते. यावेळी अक्षय राऊत यांनी, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले. आंबेडकरांच्या जीवनातून चारित्र्य आणि नि:स्वार्थी जगणं हा विचार मोलाचा आहे. कुठल्याही प्रकारचा मोह न बाळगता डॉ. आंबेडकर हे शोषित, वंचितांसाठी अविरत झटत राहिले. हक्कासाठी लढत राहिले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान राऊत यांनी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविषयी मत व्यक्त केले. केंद्राने शेतकऱ्यांना संपवण्यासाठी व भांडवलदारांच्या हाती शेतकऱ्यांचे सर्व सूत्र देण्याच्या उद्देशाने तीन कृषी कायदे केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा अधिकार कार्पोरेट क्षेत्राच्या हाती जाणार आहे. याविरोधात पंजाब, हरयाणा, झारखंड, बिहारचे शेतकरी लढा देत आहेत. त्याचप्रमाणे संवैधानिक पद्धतीने महाराष्ट्रातसुद्धा शेतकरी लढा उभारण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश घनगाव होते. आकाराम सरोदे, राहुल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. भेंडीकाजी येथील विनय कुमरे, राम मते, अजय कुमरे, शुभम हातोलकर,अमोल उमाळे, पवन काकडे, राजेश सरोदे, नितीन मडावी, आदित्य मानतकर, अमन उमाळे, पवन तोडकर, मोहन देवळे, गजानन कुमरे, राजेश उमाळे, मंगेश जाधव, अभिषेक मानतकर आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
फोटो :