Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पूर्व : भाजपा वर्चस्व राखणार; की ‘वंचित’ बाजी मारणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:51 AM2019-10-22T10:51:55+5:302019-10-22T10:52:10+5:30
भाजपा वर्चस्व कायम राखणार की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या मतदानात अकोला पूर्व मतदारसंघात 55.77 टक्के मतदान झाले असून, भाजपाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर व वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याने, या मतदारसंघात पुन्हा भाजपा वर्चस्व कायम राखणार की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ३५० मतदान केंद्रांवर २१ आॅक्टोबर मतदान घेण्यात आले. मतदानानंतर मतदारसंघात निवडणूक लढवित असलेल्या विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून १३ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. मतदारसंघात55.77 टक्के मतदान झाले असून, मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. मतदारसंघात झालेले मतदान बघता, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अटीतटीच्या लढतीत मतदारसंघात भाजपा पुन्हा वर्चस्व कायम राखणार की, वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली असून, मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याबाबतचे चित्र मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.