Maharashtra Assembly Election 2019: युतीधर्म सांभाळण्याची कसरत; खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:28 PM2019-10-19T13:28:45+5:302019-10-19T13:28:52+5:30

युतीधर्म सांभाळण्यात विजयश्री खेचून आणण्यासाठी खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Coalition Workout; Reputation of MPs! | Maharashtra Assembly Election 2019: युतीधर्म सांभाळण्याची कसरत; खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

Maharashtra Assembly Election 2019: युतीधर्म सांभाळण्याची कसरत; खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

Next

- राजेश शेगोकार
अकोला: पश्चिम वºहाडातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ चार मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळविता आला नाही; मात्र लोकसभा निवडणुकीत तीनही खासदार विजयी करून महायुतीने पश्चिम वºहाडावर आपल्या वर्चस्वाचा झेंडा गाडला आहे. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकीत शतप्रतिशत यश, असे उद्दिष्ट समोर ठेवून महायुती कामाला लागली असून, युतीधर्म सांभाळण्यात विजयश्री खेचून आणण्यासाठी खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावतील अन् मग खऱ्या अर्थाने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू होईल. यामध्ये खासदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वाशिमच्या खासदार भावना गवळी या सलग पाचव्यांदा विजयी झाल्या असून, असा विक्रम करणाºया त्या पहिल्या महिला खासदार आहेत, तर प्रतापराव जाधव यांनी हॅट्ट्रिक करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. हे तीनही खासदार लोकनेते व राजकीयदृष्ट्या ‘हेवीवेट’ आहेत. त्यामुळे आपापल्या कार्यक्षेत्रात शतप्रतिशत विजयाचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.


लक्षवेधी लढती
वाशिम: जिल्ह्यात तीन मतदारसंघ असून, त्यापैकी कारंजा, वाशिम भाजपकडे तर रिसोड शिवसेनेला देण्यात आला आहे. वाशिममध्ये भाजप उमेदवार लखन मलिक यांच्याविरोधात शिवसेनेच्या शशिकांत पेंढारकर यांनी बंडखोरी केली असून, त्यांच्या प्रचारात सेनेचे जिल्हाप्रमुखच रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सेनेच्या खासदार म्हणून भावना गवळी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बुलडाण्यात सेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाही जागा दाखवून आपले एक हाती नेतृत्व प्रस्थापित केले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर युतीमध्ये जिल्ह्यात जाधव व आ. डॉ. संजय कुटे या दोन नेत्यांचाच शब्द अंतिम समजला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी बुलडाण्यात संजय गायकवाड यांच्या रूपाने शिवसेनेचा नवा चेहरा रिंगणात उतरविला आहे. येथे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ‘वंचित’ची धरलेली कास अन् भाजपचे नेते योगेंद्र गोडे यांनी अपक्ष उभे राहत केलेली बंडखारी असे पक्षांतर्गतच आव्हान सेनेसमोर आहे. त्यामुळे बुलडाण्याची जागा खा. जाधव यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. येथे काँग्रेसचे ‘हेवीवेट’ उमेदवार हर्षवर्धन सपकाळ रिंगणात असल्याने चौरंगी लढतीत युतीधर्म सांभाळून मतविभाजन टाळण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.
अकोल्यातील पाचपैकी चार मतदारसंघांत २०१४ च्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या अकोल्यातील बाळापूरमध्ये शिवसेनेचे नितीन देशमुख रिंगणात आहेत. या मतदारसंघात गतवेळीही युतीधर्म अडचणीत होता, यंदाही परिस्थिती तीच असली तरी उघड बंडखोरी नाही. त्यामुळे सुप्त नाराजी आहे. मूर्तिजापुरात तर विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्याविरोधात सेनेने उघडपणे नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये बंडखोरी करीत या पक्षाचे पदाधिकारी राजकुमार नाचणे यांनी ‘प्रहार’चा झेंडा हाती घेतला. खुद्द आमदार पिंपळे यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात बेताल वक्त व्य करून पक्षालाच अडचणीत आणले आहे. अकोट मतदारसंघात शिवसेनेत झालेली बंडखोरी हे आव्हान मोडून काढण्यासाठी ना. धोत्रे यांच्यासमोर पेच आहे.

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Coalition Workout; Reputation of MPs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.