Maharashtra Assembly Election 2019: हिरपूर सांजापूरवासीयांचा मतदानावरील बहिष्कार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:06 PM2019-10-20T13:06:33+5:302019-10-20T13:06:41+5:30
उपविभागीय अधिकाºयांनी मागण्या मान्य केल्याने हिरपूर सांजापूर परिसरातील शेतकºयांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिरपूर : हिरपूर सांजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच गावातच साखळी उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकाºयांनी मागण्या मान्य केल्याने हिरपूर सांजापूर परिसरातील शेतकºयांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.
हिरपूर सांजापूर शिवारामध्ये जून-जुलैमध्ये पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने पेरण्या उलटल्या. ज्या शेतांमध्ये पिके निघाली, ती पिके पावसाच्या खंडामुळे सुकली. त्यामुळे हिरपूर शेतशिवार व लगतच्या शिवारातील ९० टक्के जमीन काळी असल्यामुळे खरीप हंगाम हातातून निघून गेला. शेतकºयांनी विविध मागण्यांसाठी ११ आॅक्टोबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली होती.
तसेच मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचासुद्धा इशारा दिला होता. प्रशासनाने हिरपूर सांजापूर व लगतचा शेतशिवार असा सर्व्हे करून शेतकºयांच्या मागण्या मान्य केल्या. १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी यांनी उपोषण मंडळाला भेट देऊन हिरपूर सांजापूर व लगतच्या शेतशिवाराचा संपूर्ण सर्व्हे करून शेतकºयांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे सांगितले. तसेच निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. शेतकºयांनी प्रशासनावर विश्वास ठेवून साखळी उपोषण तसेच निवडणुकीवरील बहिष्काराचा इशारा मागे घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तालुका कृषी अधिकारी काळे, मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी पांगारकर व कृषी सहायक पवार यांनी भेट दिली. यावेळी संजय फडनाईक, राजू वानखडे, शंकरराव ठाकरे, गणपतराव गुल्हाने, केशवराव देशमुख, रवींद्र दहीकर, उपसरपंच पुरुषोत्तम चारथळ, गोवर्धन कोल्हे, नीलेश गुल्हाने, सदाशिव चारथळ, सुरेश डवंगे, प्रमोद तिहिले, पप्पू हागे, रूपराव ढगे, सुयोग वºहेकर, नीलेश गावंडे, किशोर गुप्ता, अरुण फुलंब्रीकर, दिलीप तिहिले, प्रवीण ढगे व बहुसंख्य शेतकरी या वेळेस उपस्थित होते. (वार्ताहर)