लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात, अकोला पूर्वत दुपारपर्यंत अठरा टक्के मतदान
By नितिन गव्हाळे | Updated: November 20, 2024 12:07 IST2024-11-20T12:05:20+5:302024-11-20T12:07:15+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात, अकोला पूर्वत दुपारपर्यंत अठरा टक्के मतदान
अकोला: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मोठया उत्साहाने निवडणुकीच्या या राष्ट्रीय लोक उत्सवात सहभागी होत आहे.
अकोला जिल्ह्यातील 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता आज मतदान घेण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील एकूण 16,37,894 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अकोला पूर्व मतदार संघामध्ये तीन लाख 53 हजार 690 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत अकोला पूर्व मतदार संघात एकूण 18 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. शहरातील भारत विद्यालय, जागृती विद्यालय,महाराष्ट्र माध्यमिक शाळा दिवेकर विद्यालय, रामदास पेठेतील मनपा शाळा क्रमांक सात, डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा, यासह इतर मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले.