महायुतीपुढे ‘वंचित’, मविआचे आव्हान; पाचपैकी चार मतदार संघांवर सध्या भाजपचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:50 PM2024-10-25T13:50:23+5:302024-10-25T13:53:05+5:30
भाजपला जिल्ह्यात उद्धवसेनेचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे आव्हानही असेल.
जिल्हा अकोला : मनोज भिवगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला: विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील महायुतीचा मजबूत किल्ला भेदण्याचे काम महाविकास आघाडीला करावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघ महायुतीतील भाजपच्या ताब्यात आहेत.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणता मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत उत्सुकता होती. हा तिढाही सुटत आला आहे. अकोला जिल्हा हा भाजपसाठी जमेची बाजू राहिला आहे. यापूर्वी एकसंघ शिवसेना भाजपसोबत होती. यावेळी भाजपला जिल्ह्यात उद्धवसेनेचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे आव्हानही असेल.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- जिल्ह्यातील खारपानपट्टा विकासाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचाठरणार आहे.
- जिल्ह्यातील युवकांसाठी येथे पुरेशा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, हा मुद्दाही गाजेल.
- नदी जोड प्रकल्प, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना हे मुद्देही महत्त्वाचे ठरणार आहेत.
- जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा मुद्दा हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा ठरलेला आहे.
- जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याशिवाय विविध विकास प्रकल्प, आदी मुद्देही चर्चेत येणार आहेत.
५७% - मतदान २०१९ मध्ये विधानसभेसाठी झाले होते.
७३ - उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशीब आजमावले.
०४ - जिल्ह्यांतील चार मतदारसंघातील आमदार पुन्हा निवडणूक आले.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
विधानसभा मतदारसंघ मतदान विद्यमान आमदार पक्ष मिळालेली मते
- अकोला पश्चिम ९९% गोवर्धन शर्मा (दिवंगत) भाजप ७३,२६२
- अकोला पूर्व ९९% रणधीर सावरकर भाजप १,००,४७५
- अकोट ९९% प्रकाश भारसाकळे भाजप ४८,५८६
- बाळापूर ९९% नितीन देशमुख उद्धवसेना ६९,३४३
- मूर्तिजापूर ९९% हरीश पिंपळे भाजप ५९,५२७