महाराष्ट्र बजेट 2020 : खारपाणपट्टा दुर्लक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 04:13 PM2020-03-07T16:13:41+5:302020-03-07T16:13:50+5:30

महाराष्ट्र बजेट 2020

Maharashtra Budget 2020: Drinking water is ignored! | महाराष्ट्र बजेट 2020 : खारपाणपट्टा दुर्लक्षित!

महाराष्ट्र बजेट 2020 : खारपाणपट्टा दुर्लक्षित!

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला: खारपाणपट्ट्यातील अल्कधर्मी व खाऱ्या पाण्याच्या सेवनामुळे पशुधन आणि कोंबड्यांना गंभीर स्वरू पाचे आजार होत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. मानवी आरोग्यवरही विपरीत परिणाम होत असून, खारे पाण्यात शेती व्यवसायही करणे कठीण झाले आहे. यावर संशोधन होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि ‘एमसीईएआर’ने स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्राचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. तथापि, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून, यावर्षीच्या अर्थसंकल्पातही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
वºहाडातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४० ते ५० किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील १६ तालुक्यांतील ८९२ गावे या खारपाणपट्ट्यात मोडतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र आहे. खारपाणपट्ट्यातील माती चोपण असून, पिण्याचे पाणी खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषी माल उत्पादनावर त्याचा परिणाम तर होतोच, मानवी आरोग्यालाही हे पाणी घातक असल्याने वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. उत्पादन कमी होत असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या एकूण सामाजिक व आर्थिक स्तरावर झालेला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खारपाणपट्ट्यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र या विद्यापीठात देण्यात यावे, या मागणीचा प्रस्ताव डिसेंबर २०१३ व जानेवारी २०१५ तसेच २१०६ आणि २०१८ मध्ये भारतीय कृषी संशोधन व महाराष्टÑ कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविला होता. खारपाणपट्ट्यात जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश करण्यास तत्कालीन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात आला; पण अद्याप कृषी विद्यापीठाला स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्र मंजूर झाले नाही. एमसीईएआरनेही या प्रस्तावाची दखल घेत, त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले होते. तथापि, यावर्षीच्या अर्थसंकल्पात सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याने खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 मत्स्य व्यवसायावर भर!
अर्थसंकल्पात खारे पाणी, मत्स्य व्यवसायावर भर देण्यात आला आहे; परंतु या भागातील पाऊस अनिश्चित असल्याने पावसाच्या पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय, शेती करावी कशी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

 

Web Title: Maharashtra Budget 2020: Drinking water is ignored!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.