महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांप्रती असंवेदनशिल -  हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:37 PM2019-09-04T18:37:09+5:302019-09-04T18:37:18+5:30

मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे.

 Maharashtra Chief Minister insensitive to farmers - Hardik Patel | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांप्रती असंवेदनशिल -  हार्दिक पटेल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांप्रती असंवेदनशिल -  हार्दिक पटेल

Next

अकोला: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रा घेऊन अकोल्यात आले होते त्या यात्रेच्या पुर्वसंध्येला सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आपल्या समस्यकडे लक्ष वेधले मात्र या शेतकºयांची व्यथा जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. निवडणुकीचा प्रचार करून ते निघुन गेले. तुमचे मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे अशी टीका किसान क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली.
काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’च्यावतीने ४ सप्टेंबर रोजी स्वराज्य भवन येथून बेरोजगार यात्रा काढण्यात आली. या यात्रे दरम्यान पटेल यांनी युवकांशी संवाद साधला ते म्हणाले की ााजपच्या सत्ताकाळात बेकारी प्रचंड वाढली आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार युवक-युवती बेरोजगार आहेत. बेरोजगारांना नोकरी, रोजगार देण्यात शासन अपयशी ठरले आहे. शासनाने बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती करावी यासाठी एनएसयूआयच्यावतीने बेरोजगार यात्रा काढली आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, सरकारी शाळा बंद होत आहेत, खाजगी शाळांची फी परवडत नाही, तरूणांना रोजगार नाही अशा सर्व मुद्यावर आता तरूणांनी बोलले पाहिजे. पेटून उठले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, प्रवक्ता अभिजित कांबळे,एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आकाश कवडे , किसान क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे, विदर्भ अध्यक्ष माणिक शेळके आदी उपस्थित होते.

Web Title:  Maharashtra Chief Minister insensitive to farmers - Hardik Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.