Maharashtra Election 2019 : अकोला जिल्ह्यात १०७ उमेदवारांचे १५८ अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:23 PM2019-10-05T13:23:42+5:302019-10-05T13:24:42+5:30

उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी पाचही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये होणार आहे.

Maharashtra Election 2019: 107 candidates file 158 application in Akola district! | Maharashtra Election 2019 : अकोला जिल्ह्यात १०७ उमेदवारांचे १५८ अर्ज दाखल!

Maharashtra Election 2019 : अकोला जिल्ह्यात १०७ उमेदवारांचे १५८ अर्ज दाखल!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (शुक्रवार, ४ आॅक्टोबरपर्यंत) अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांत १०७ उमेदवारांचे १५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी पाचही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये होणार आहे.
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गत २७ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ आॅक्टोबरपर्यंत) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत १०७ उमेदवारांनी १५८ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये दाखल केले. विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून पाचही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये होणार आहे.


अकोला पश्चिम मतदारसंघ - साजीद खान मन्नान खान (काँग्रेस), मदन भरगड (वंचित बहुजन आघाडी), नकीरखा अहमदखा (एआयएमआयएम), डॉ. धनंजय नालट (बसपा), शक्तिदास खरारे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. अशोक ओळंबे (अपक्ष), राहुल जाधव (अपक्ष), रोहित तिवारी (अपक्ष), जनार्दन कानडे (राष्ट्रीय संत संदेश), संतोष इंगळे (बहुजन विकास आघाडी).


अकोला पूर्व मतदारसंघ : हरिदास भदे (वंचित बहुजन आघाडी), विवेक पारसकर (काँग्रेस),अनिल कपले (अपक्ष), अजाबराव ताले (अपक्ष),भानुदास कांबळे (अपक्ष), संजय आठवले (अपक्ष), शेषराव खडसे (बसपा), प्रफुल्ल भारसाकळे (संभाजी ब्रिगेड), अशोक कोलटक्के (अपक्ष), दीपक तेलगोटे (अपक्ष).


अकोट विधानसभा मतदारसंघ- वामन बलदेव सरकटे (बहुजन समाज पार्टी), प्रमोद रामचंद्र खंडारे (अपक्ष), शोभा मनोहर शेळके (अपक्ष), संतोष सूर्यभान देऊळकार (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमोक्रॅटिक), अनिल माणिकराव गावंडे (अपक्ष), संतोष वसंत रहाटे (वंचित बहुजन आघाडी), गजानन शांताराम तायडे (महाराष्ट्र परिवर्तन सेना टी), रामकृष्ण लक्ष्मण ढिगर (बहुजन मुक्ती पार्टी), जितेंद्र बसवंतराव साबळे (अपक्ष), शेख निसार शेख गुलाब (अपक्ष), अमोल मोतीराम व्यवहारे (विदर्र्भ माझा पार्टी), अब्दुल खालीक अब्दुल कादर (अपक्ष), केशव कृष्णराव बिलबिले (अपक्ष), संतोष श्रीकृष्ण हुशे (वंचित बहुजन आघाडी).


बाळापूर विधानसभा मतदारसंघ- संग्राम गुलाबराव गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), धैर्यवर्धन हरिभाऊ पुंडकर (वंचित बहुजन आघाडी), चंद्रशेखर दौलतराव चिंचोळकर (काँग्रेस), ब्रम्हदेव तुळशीराम इंगळे (अपक्ष), नारायणराव हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष), दिनकर सूर्यभान रणबावळे (महाराष्ट्र परिवर्तन सेना), बळीराम भगवान सिरस्कार (अपक्ष), मुशरीफ अहेमद गुलाम अहमद (अपक्ष), संदीप दादाराव पाटील (अपक्ष), संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), डॉ. रहेमान खान (एमआयएम), तुकाराम उकर्डा दुधे (स्वाभिमानी पक्ष), रईस अहमद शेख नूर (अपक्ष), सुनीता सुधाकर वानखडे (पीपल पार्टी आॅफ इंडिया डेमोक्रॅटिक), सविता सिद्धार्थ धाडसे (अपक्ष).


मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ- हरीश मारोतीआप्पा पिंपळे (भाजप), प्रतिभा प्रभाकर अवचार (वंचित बहुजन आघाडी), राजकुमार नारायण नाचणे (प्रहार जनशक्ती पक्ष), सुरेश नामदेवराव गोपकर (अपक्ष), बाबुलाल आकाराम इंगळे (अपक्ष), धनराज रामचंद्र खिराडे (अपक्ष), पांडुरंग मोरोपंत इंगळे (बहुजन विकास आघाडी), तुषार आनंदराव दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), गौतम नामदेव कंकाळ (महाराष्ट्र परिवर्तन सेना टी), दयाराम घोडे (अपक्ष), महादेव बापुराव गवळे (अपक्ष), मेवालाल शिवचरण देवीकर (अपक्ष), रामेश्वर श्रीराम जामनीकर (अपक्ष), रवी नागोराव मेश्राम (बहुजन समाज पार्टी), सम्राट जयराम डोंगरदिवे (वंचित बहुजन आघाडी), शरद नामदेवराव गवई (वंचित बहुजन आघाडी), बळीराम गोंडुजी इंगळे (अपक्ष), राजेश तुळशीराम खडे (अपक्ष), रवीकुमार रमेशचंद्र राठी (अपक्ष).

Web Title: Maharashtra Election 2019: 107 candidates file 158 application in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.