Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:50 PM2019-10-05T18:50:32+5:302019-10-05T18:50:43+5:30

दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेत ३४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

Maharashtra Election 2019: 34 candidates from West Varhada drop out! | Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद !

Maharashtra Election 2019 : पश्चिम वऱ्हाडात उमेदवारांचे ३४ अर्ज बाद !

Next

अकोला : पश्चिम वºहाडातील अकोला,वाशिमबुलडाणा जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघातून दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी शनिवारी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेत ३४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यात मलकापूर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चैनसुख संचेती यांनी विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा न देता उमेदवारी अर्ज भरल्याचा आक्षेप घेण्यात आला असून, मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार रवी राठी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरही आक्षेप घेण्यात आला आहे.
-अकोला
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननीत पाचही विधानसभा मतदारसंघात १०१ उमेदवारांचे १३४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, आठ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ आॅक्टोबरपर्यंत) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात १०७ उमेदवारांनी १५८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
-बुलडाणा
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दाखल अर्जांपैकी २२ जणांचे अर्ज छानणीमध्ये अवैध ठरले.दरम्यान, मलकापूर येथे विद्यमान आमदार
चैनसुख संचेती यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली असून त्यावर एसडीओ कार्यालयात सध्या सुनावणी सुरू आहे. विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा न देता त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे.
-वाशिम
जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड विधानसभा मतदारसंघातून अंतीम मुदतीपर्यंत ६३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यातील चौघांचे नामांकन रद्द झाले आहेत.त्यामुळे आता निवडणूकीत ५९ उमेदवार कायम आहेत.

 

Web Title: Maharashtra Election 2019: 34 candidates from West Varhada drop out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.