Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 02:31 PM2019-10-04T14:31:40+5:302019-10-04T14:32:12+5:30

आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Election 2019: Candidate filled out by Prakash Bhasakale | Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत महायुतीचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारआमदार प्रकाश भारसाकळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी महायुतीमधील शिवसेना, रासप, रिपाइं (आठवले गट), रयत क्रांती, शिवसंग्राम या पक्षासह भाजपाच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारसाकळे यांच्या विजयाचा संकल्प केला.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. अर्ज भरल्यानंतर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. रमेश बुंदिले, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. संजय शर्मा, जिल्हा चिटणीस रासप जिल्हाध्यक्ष सतीश हांडे, अंजनगावचे नगराध्यक्ष कमलाकर लाडोले, डॉ. बाबूलाल शेळके, श्रीकृष्ण मोरखडे, माधव मानकर, राजेश नागमते, जिल्हा चिटणीस संदीप उगले, कृष्णा तिडके, बाळासाहेब नेरकर, सतीश हांडे, नयना मनतकार, स्मिता राजणकार, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर बोडखे, केशवराव ताथोड, अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, दर्यापूरच्या नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्याम गावंडे, जिल्हा संघटिका माया म्हैसने, कुसुम भगत, अकोट तालुका अध्यक्ष राजेश रावणकार, शहराध्यक्ष कनक कोटक, तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर, शहर अध्यक्ष ओमभाऊ सुईवाल, विजय जवंजाळ, रामदास भेंडे, राजेश पाचाडे, मधुकर पाटकर, दत्तू गावंडे, सुनील गिरी, अनिरुद्ध देशपांडे, हरीश टावरी, संतोष राऊत, चेतन मर्दाने, बाळासाहेब घावट, केवटीताई, मंगेश पटके, पुंजाजी मानकर, प्रवीण येऊल , रमेश दुतोंडे, लखन राजणकर, विठ्ठल वाकोडे, मनोज चंदन, विलास बोडखे, वैभव बढे, श्याम गावंडे, विपुल गडम आदी उपस्थित होते. दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या आदेशावरुन अकोट मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळावा, असे आवाहन केले.


मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास- भारसाकळे
अकोट मतदारसंघातील जनतेचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे.या परिसरातील प्रश्नांवर मी सातत्याने आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सिंचन, पिण्याचे पाणी याबाबतच्या समस्या, त्या सातत्याने लावून धरल्या. केवळ विकास करणे हेच माझे ध्येय आहे आणि सकारात्मक विचार करून सबका साथ सबका विकास हाच संकल्प असल्याने आपला आशिर्वाद द्यावा असे आवाहन प्रकाश भारसाकळे यांनी केले.


भारसाकळे यांच्या पाठीशी रहा-ना.धोत्रे
आमदार म्हणून अकोट मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात प्रकाश भारसाकळे यशस्वी झाले आहेत. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास येतील अशी ग्वाही देत अकोट मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भारसाकळे यांच्या पाठीशी राहून महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा या मतदारसंघावर फडकवावा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.

Web Title: Maharashtra Election 2019: Candidate filled out by Prakash Bhasakale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.