महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवस गोंदिया ते पुणेपर्यंतच धावणार

By Atul.jaiswal | Published: February 23, 2023 05:21 PM2023-02-23T17:21:44+5:302023-02-23T17:22:02+5:30

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सातारा - कोरेगाव स्थानकादरम्यान तांत्रिक कामामुळे या मार्गावरील गाड्यांचे आवागमन २७ व २८ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आले आहे.

Maharashtra Express will run from Gondia to Pune only for two days | महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवस गोंदिया ते पुणेपर्यंतच धावणार

महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवस गोंदिया ते पुणेपर्यंतच धावणार

googlenewsNext

अकोला - मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सातारा - कोरेगाव स्थानकादरम्यान तांत्रिक कामामुळे या मार्गावरील गाड्यांचे आवागमन २७ व २८ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आले आहे. परिणामी कोल्हापूर ते गोंदियादरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवस पुणे ते गोंदिया व गोंदिया ते पुणे स्थानकांपर्यंतच धावणार आहे.

मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी गोंदियाहून निघणारी गाडी क्रमांक ११०४० गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यंतच धावेल. ही गाडी पुणे ते कोल्हापूर रद्द करण्यात आली आहे, तर २८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी ११०३९ कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही पुणे स्थानकावरून गोंदियासाठी निघणार आहे. ही गाडी कोल्हापूर ते पुणे रद्द करण्यात आली आहे. ऐनवेळी ही गाडी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Web Title: Maharashtra Express will run from Gondia to Pune only for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला