Maharashtra Gram Panchayat Election Results : अकोला जिल्ह्यात नवागतांच्या हातात गावगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 07:55 PM2021-01-18T19:55:41+5:302021-01-18T19:59:11+5:30

Maharashtra Gram Panchayat Election Results प्रस्थापितांच्या पॅनलला नकार देत मतदारांनी नव्या दमाच्या तरूणांच्या हाती सत्ता साेपविली आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results : Newcomers wins in Akola district Gram panchayat Election | Maharashtra Gram Panchayat Election Results : अकोला जिल्ह्यात नवागतांच्या हातात गावगाडा

Maharashtra Gram Panchayat Election Results : अकोला जिल्ह्यात नवागतांच्या हातात गावगाडा

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार अमाेल मिटकरी यांच्या नेतृत्वातील पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. मुर्तीजापूर तालुक्यातील २७ गावांपैकी अनेक गावांमध्ये मतदारांनी बदल घडविला आहे. तेल्हाऱ्यात' वंचित'ला ३२ पैकी १४ ग्रामंपचातीवर यश, तरीजिप अध्यक्षांच्या गावातच पराभुत झाले आहे. 

अकाेला:  जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर झाले असून या निकालामध्ये मतदारांनी तरूणांना तसेच नवागतांना संधी देत त्यांच्या हाती गावगाडा साेपविला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तनाचा बिगुल वाजला आहे. प्रस्थापितांच्या पॅनलला नकार देत मतदारांनी नव्या दमाच्या तरूणांच्या हाती सत्ता साेपविली आहे. अकाेट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचाायत मध्ये आमदार अमाेल मिटकरी यांच्या नेतृत्वातील पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. तर काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल याच्या माेहळा गावात त्यांच्या गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. तालुक्यातील अर्ध्याधिक ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन घडले आहेबाळापूर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतपैकी वाडेगाव, पारस, गायगाव, हातरूण, निमकर्दा, उरळ या माेठया गावांमध्ये परिर्वतनाची लाट आहे. रिधाेरामध्ये सत्ता जैसे थे ठेवण्यात आली आहे. मुर्तीजापूर तालुक्यातील २७ गावांपैकी अनेक गावांमध्ये मतदारांनी बदल घडविला आहे. कुरूम, सिरसाे, हातगाव या माेठया गावामंध्ये दीड दशकांपासून सत्तेचे परिवर्तन घडले आहे.  बार्शीटाकळी तालुक्यातही पिंजर, राजंदा, महान या गावात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले आहे.  तेल्हाऱ्यात वंचितला ३२ पैकी १४ ग्रामंपचातीवर यश मिळाले असले, तरी जिप अध्यक्षांच्या गावातच वंचित पराभुत झाले आहे. अकाेला तालुक्यातही परिवर्तनाचे वारे आहेत. तर पातुर तालुक्यात सेनेला १६ ग्रामपंचातीवर झेंडा फडकविता आला आहे.

Web Title: Maharashtra Gram Panchayat Election Results : Newcomers wins in Akola district Gram panchayat Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.