Maharashtra HSC result 2018 - अकोला जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला उद्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 03:54 PM2018-05-29T15:54:02+5:302018-05-29T15:54:02+5:30

बुधवार ३0 मे रोजी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयी उत्सुकता आहे.

 Maharashtra HSC result 2018 - Decision of 27 thousand students in Akola district tomorrow | Maharashtra HSC result 2018 - अकोला जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला उद्या 

Maharashtra HSC result 2018 - अकोला जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला उद्या 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात अमरावती मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आता ३0 मे रोजी बारावीचा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

अकोला: उच्च माध्यमिक(इयत्ता १२ वी)ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून  २१ फेब्रुवारी ते २४ मार्चदरम्यान ८0 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली. बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २७ हजार ३१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. बुधवार ३0 मे रोजी इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयी उत्सुकता आहे. जिल्ह्यातून कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अव्वल ठरेल. याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष वेधल्या जाणार आहे.
जिल्ह्यात अमरावती मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत पार पडली. आता ३0 मे रोजी बारावीचा निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे. बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्राविण्यश्रेणीचे गुण मिळावेत अशी अपेक्षा आहे. अमरावती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजता जाहिर करण्यात येईल. बारावीच्या परीक्षेला अकोला तालुक्यातून १0९१५, अकोट तालुक्यातून ३५१६ ,बाळापूर तालुक्यातील २८१५, बार्शिटाकळी तालुक्यामधून ३२७४, पातूर तालुक्यातून २४८९, तेल्हारा तालुक्यातून २0४२ आणि मुर्तिजापूर तालुक्यातून २२६८ प्रविष्ट झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title:  Maharashtra HSC result 2018 - Decision of 27 thousand students in Akola district tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.