महाराष्ट्र कला मित्र आणि कला भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

By admin | Published: May 26, 2014 11:55 PM2014-05-26T23:55:09+5:302014-05-27T18:50:20+5:30

अकोला भारतीय कला प्रोत्साहन मंचच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदादेखील उत्कृष्ट गायक, नाट्य कलाकार, बाल कलाकार, नर्तक, प्रवचनकार, कीर्तन व भजनकार, लोकगायक, लोकसंगीत, लावणी, तबला वादक, ऑर्केस्ट्रा ग्रुप कलामंच, व्यंग चित्रकार, उद्घोषक, मिमिक्री आदी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra invites proposals for the Art Friends and Art Bhushan Award | महाराष्ट्र कला मित्र आणि कला भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

महाराष्ट्र कला मित्र आणि कला भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

Next

अकोला : भारतीय कला प्रोत्साहन मंचच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदादेखील उत्कृष्ट गायक, नाट्य कलाकार, बाल कलाकार, नर्तक, प्रवचनकार, कीर्तन व भजनकार, लोकगायक, लोकसंगीत, लावणी, तबला वादक, ऑर्केस्ट्रा ग्रुप कलामंच, व्यंग चित्रकार, उद्घोषक, मिमिक्री आदी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कला क्षेत्राशी निगडित या विविध पुरस्कारांसाठी राज्यस्तरीय व विदर्भस्तरीय अशा दोन वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कला प्रोत्साहन मंचाच्या अध्यक्षा रेणू सोनी यांनी दिली. निवड झालेल्या स्पर्धकांना महाराष्ट्र कला मित्र आणि महाराष्ट्र कला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. प्रवेशिका पाठविताना स्पर्धकांनी गत दोन वर्षात विविध संस्थेद्वारा प्रसिद्धी देण्यात आलेल्या किंवा वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या कात्रणांच्या सत्यप्रती ३0 जूनपर्यंत भारतीय कला प्रोत्साहन मंच, मुख कार्यालय, विशाखा निवास, अजय नगर, अंबाझरी हिल टॉप, नागपूर या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Web Title: Maharashtra invites proposals for the Art Friends and Art Bhushan Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.