Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 07:31 PM2024-11-13T19:31:54+5:302024-11-13T19:38:03+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ अकोला दौऱ्यावर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीच्या राज्यभर सभा सुरू आहेत. भाजपाच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्याही राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. आमदार वाघ आज अकोला दौऱ्यावर आहेत, त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न केला. यावेळी चित्रा वाघ यांनी एका वाक्यात उत्तर दिले.
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका
एका मुलीच्या आत्महत्येनंतर आमदार संजय राठोड यांच्यावर टीका करण्यात आल्या होत्या. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सर्वाधिक टीका केल्या होत्या. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना विरोध केला होता. यामुळे आता महायुतीमध्ये आमदार चित्रा वाघ राठोड यांचा प्रचार करणार की नाही या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
दरम्यान, आज अकोल्यात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, आम्हाला पक्षाने कार्यक्रम दिले आहे. ज्या ठिकाणी पक्षाने आम्हाला जायला सांगितले आहे तिथे आम्ही जाणार आहे. कालपासून मी विदर्भात प्रचार सुरू केला आहे. यावेळी पत्रकारांनी वाघ यांना संजय राठोड यांच्या प्रचारासाठी जाणार का? असा प्रश्न केला, यावर बोलताना वाघ म्हणाल्या, महायुतीच्या उमेदवारांनी निवडून आणण्यासाठी जिथे गरज आहे तिथे आम्ही पोहोचणार आहे, असंही आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
"उद्धवजी... बॅगा फक्त तुमच्या तपासल्या जात नाही तर प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मात्र प्रत्येकजण तुमच्यासारखा कांगावा करत नाही. आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक करतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.