ZP Election Results 2021 : गावातच पराभव! अमोल मिटकरींना मोठा धक्का; बच्चू कडू यांच्या प्रहारची जिल्हा परिषदेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 01:47 PM2021-10-06T13:47:53+5:302021-10-06T13:48:50+5:30

Maharashtra ZP Election Result 2021 Big blow to Amol Mitkari in Kutasa; Victory of Bachchu Kadu's Prahar janashakti party candidate कुटासा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांचे गाव आहे. आमदार झाल्यापासून अमोल मिटकरी यांनी कुटासा गावातच सर्वाधिक निधी दिल्याचे समजते. यामुळे येथील निवडणूक ही मिटकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती.

Maharashtra ZP Election Result 2021 Big blow to Amol Mitkari in Kutasa; Victory of Bachchu Kadu's Prahar janashakti party candidate | ZP Election Results 2021 : गावातच पराभव! अमोल मिटकरींना मोठा धक्का; बच्चू कडू यांच्या प्रहारची जिल्हा परिषदेत एन्ट्री

ZP Election Results 2021 : गावातच पराभव! अमोल मिटकरींना मोठा धक्का; बच्चू कडू यांच्या प्रहारची जिल्हा परिषदेत एन्ट्री

googlenewsNext

अकोला- अकोला जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत, अकोट तालुक्यातील कुटासा येथील लढत चांगलीच गाजली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना मोठा धक्का बसला आहे. येथून राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार छबुताई राऊत या त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होत्या. (ZP Election Result 2021 Big blow to Amol Mitkari in Kutasa; Victory of Bachchu Kadu's Prahar janashakti party candidate)

कुटासा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांचे गाव आहे. आमदार झाल्यापासून अमोल मिटकरी यांनी कुटासा गावातच सर्वाधिक निधी दिल्याचे समजते. यामुळे येथील निवडणूक ही मिटकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. येथे आमदार मिटकरी आणि पालकमंत्री बच्चू कडू यांच्यात थेट सामना बघायला मिळाला. मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांच्यावर थेट निशाणा साधला होता. पालकमंत्री बच्चू कडू यांनी कुटासा जिल्हा परिषद गटात भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी यांनी केला होता. 

या निवडणुकीत महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मतदारसंघात जाहीर सभाही घेतली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्रितपणे रिंगणात होते.

पक्ष, उमेदवार आणि मिळालेली मते - 
प्रहार जनशक्ती पक्ष - स्फूर्ती निखील गावंडे - 2597
वंचित बहुजन आघाडी - सुलता शिवदास बुटे - 2378
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - छबूताई गजाननराव राऊत  - 2127
भाजप - कोमल गोपाल पोटे - 1873
इंडियन नॅशनल काँग्रेस - अर्चना संतोष जगताप - 1647

Web Title: Maharashtra ZP Election Result 2021 Big blow to Amol Mitkari in Kutasa; Victory of Bachchu Kadu's Prahar janashakti party candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.