माणकी येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:18 AM2021-03-21T04:18:06+5:302021-03-21T04:18:06+5:30
कान्हेरी गवळी : येथील ग्राम मानकी येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण कार्यशाळा जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन महाले व तालुका ...
कान्हेरी गवळी : येथील ग्राम मानकी येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण कार्यशाळा जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन महाले व तालुका व्यवस्थापक घनश्याम धनोकार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यावेळी प्रभाग समन्वयक गोपाळ भाकरे यांनी महासमृद्धी महिला सक्षमीकरणाबाबत माहिती दिली. पं. स. सभापती रुपाली गवई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी जे. एस. राठोड, सरपंच उज्वला पेटकर, उपसरपंच केसरबाई सिरसाट, सदस्य वंदना सिरसाट यांनी महिलांना मार्गदर्शन केले. गटातील महिलांच्या घरकुलाचा शुभारंभ, गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी सदस्य मंगेश मैसने, रोजगार सेवक प्रवीण सिरसाट , बाबाराव सिरसाट, ज्ञानेश्वर मैसने संविधान ग्रामसंघ पदाधिकारी विमल सिरसाट, सुलताना शेख बनु, प्रमिला सिरसाट , सुवर्णा मैसने, संध्या सिरसाट, वर्षाताई विनोद सिरसाट , ज्योती देवराव सिरसाट आणि समूहातील महिला हजर होत्या.