महात्मा फुले महाविद्यालयात पत्रकार, अधिकाऱ्यांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:36+5:302021-01-08T04:57:36+5:30
पातूर : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयात पत्रकार बांधव, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पत्रकारदिनी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या ...
पातूर : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयात पत्रकार बांधव, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पत्रकारदिनी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक शंकरराव बोचरे होते. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, ठाणेदार, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश गवळी, प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बोचरे यांच्या हस्ते तहसीलदार बाजड, ठाणेदार गवळी यांचा सत्कार केला. काेराेनाकाळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशमुख, देवानंद गहिले, प्रा. सी.पी. शेकुवाले, संजय गोतरकर, किरणकुमार निमकंडे, अविनाश पोहरे, श्रीकृष्ण शेंगोकर, अब्दुल कुद्दुस शेख, सुनील गाडगे, प्रभुदास बोंबटकार, छायाचित्रकार सतीश कांबळे, सय्यद हसन बाबू आदींचा स्मृतिचिन्ह, मास्क देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन रोडे यांनी केले. संचालन भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. गोविंद भालेराव, सहायक प्रा. प्रणोती खवणे यांनी केले. आभारप्रदर्शन गणित विभागप्रमुख प्रा. निरंजन नवले यांनी केले. यावेळी डॉ. अस्मिता खांबरे, प्रा. सुमित चौधरी, प्रा. योगेश व्यवहारे, प्रा. रोशनी लोमटे, प्रा. योगेश भोसले, शिक्षकेतर कर्मचारी निशांत सदाफळे, पवन काळपांडे, संजय बोराडे, वीरेंद्रसिंग सोळंके, पंकज मडघे, प्रशांत पाटील, अमोल साळुंके, मनोज राऊत उपस्थित होते.