महावितरण म्हणते, भारनियमन तात्पुरते!

By admin | Published: May 7, 2017 01:37 PM2017-05-07T13:37:59+5:302017-05-07T13:37:59+5:30

भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

Mahavitaran says, loads temporarily! | महावितरण म्हणते, भारनियमन तात्पुरते!

महावितरण म्हणते, भारनियमन तात्पुरते!

Next

परिस्थितीनुसार नियोजन : लवकरच भारनियमन बंद होण्याचा आशावाद
अकोला: मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात साधारणपणे १५00 मेगावॉट भारनिमयन सुरू असून, महावितरणकडून विजेचा दररोजचा मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हे भारनियमन तात्पुरते असून, लवकर ते बंद होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
विजेच्याबाबत परिस्थितीनुसार नियोजन करावे लागते. महावितरणने सर्व स्रोतांकडून उपलब्ध असलेली वीज व मागणी यांचा ताळमेळ घातला होता. कोळशावर आधारित संच बंद पडणे, कोळसा कमी उपलब्ध होणे आणि अचानक तांत्रिक कारणांमुळे वीज संच बंद पडणे या तीन कारणांमुळे विजेच्या उलब्धतेत ३ हजार मेगावॉटची कमतरता निर्माण झाली. पवन ऊर्जेतही मागच्या वषीर्पेक्षा यावर्षी ५00 मेगावॉटची कमतरता आहे.
तापमानातील बदलामुळे एकूण २ हजार मेगावॉटने विजेची मागणी वाढली आणि अंदाजे २ हजार ५00 मेगावॉट विजेची उपलब्धता कमी झाली. असे असूनही मागील ३ दिवसांपासून केवळ १ हजार ५00 मेगावॉटपर्यंतच र्मयादेत भारनियमन करण्यात येत आहे.
कोळशाच्या पुरवठय़ामध्ये वाढ करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेस्टर्न कोलफिल्ड लि. व साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये प्रयत्न सुरू आहेत. मा. ऊर्जामंत्री महोदयांनी स्वत: या प्रकरणांमध्ये लक्ष घातले असून, केंद्रीय कोळसा मंत्री यांना कोळसा उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार कोळशाच्या पुरवठय़ात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले काही संच सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेले प्रयत्न व इतर स्रोतांमधून विजेची उपलब्धता वाढण्याची शक्यता लक्षात घेता सदर भारनियमन पुढील चार-पाच दिवसांत बंद होईल. शासनस्तर किंवा ऊर्जा मंत्रालयाच्या स्तरावर विजेच्या नियोजनाचे काम केले जात नाही तर महावितरणकडूनच विजेच्या नियोजनचे काम केले जाते. वरील सर्व बाबी लक्षात घेता विजेच्या नियोजनामध्ये कुठलीही कमतरता नसून, सदर स्थिती ही अचानक उद्भवलेल्या घडामोडीमुळे निर्माण झाली आहे.

Web Title: Mahavitaran says, loads temporarily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.