महावितरण करणार ग्राहकांशी संपर्क
By admin | Published: July 6, 2015 01:35 AM2015-07-06T01:35:12+5:302015-07-06T01:45:13+5:30
शेतक-यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर आली जाग, दलाली रोखण्यासाठी प्रयत्न.
अकोला : तळेगाव बाजार येथील शेतकरी विनोद खारोडे यांची आत्महत्या व सागद येथील तायडे दाम्पत्याच्या आत्महत्येचा प्रयत्नानंतर महावि तरणमध्ये मोठय़ा प्रमाणात दलाली होत असल्याचे उघडकीस आले. या शेतकर्यांनी विष प्राशन केल्यानंतर महावितरणला जाग आली असून, आता ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. अमरावती परिमंडळातील पाचही जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून सदर संपर्क अभियान राबविण्यात येईल. या माध्यमातून प्रत्यक्ष ग्राहकांशी भेटून त्यांचे प्रश्न, तक्रारी व समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच त्याचवेळी निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय तत्काळ कार्यवाही सोबतच महावितरणच्या योजनांची माहिती व सद्यस्थिती ग्राहकांना सांगितली जाणार आहे. अमरावती परिमंडळातील काही भागांमध्ये नुक त्याच ग्राहकसेवेसंदर्भात काही अप्रिय घटना घडल्या आहेत. यातील सहभागी काही निवडक कर्मचारी व बाहेरच्या दलालांनी केलेली ग्राहकांची दिशाभूल व वस्तुस्थिती सांगण्याकरिता महावितरणकडून ग्राहक संपर्क अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नियोजित तारखेनुसार शिबिर आयोजित करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अभियानातील संपर्क शिबिरांमध्ये जिल्ह्याचे मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व जनमित्र उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये ग्राहकांच्या तक्रारी, प्रश्न व समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. यामध्ये तक्रारीच्या स्वरूपानुसार जागेवरच तत्काळ कार्यवाही व कारवाईसुद्धा होणार आहे. या शिबिरामध्ये उपलब्ध तांत्रिक स्वरूपानुसार मद तीने त्याच दिवशी तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.