नवीन वीज जोडणीकरिता महावितरण देणार घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:12 AM2017-08-23T01:12:22+5:302017-08-23T01:13:14+5:30

Mahavitaran's door to door service for new power connection | नवीन वीज जोडणीकरिता महावितरण देणार घरपोच सेवा

नवीन वीज जोडणीकरिता महावितरण देणार घरपोच सेवा

Next
ठळक मुद्देग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे नोंदणी करावी लागणार या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल कार्यालयातील कर्मचारी वीज जोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी आहे, अशा इच्छुक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन ऑन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाइल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.
नवीन वीज जोडणी सुलभतेने मिळावी. तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी. तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल २0१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यंत सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. 
ग्राहकांचा प्रतिसाद बघून, या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. नवीन वीज जोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील.  त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल.  त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीज जोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरून घेतील. यावेळी कर्मचारी ग्राहकाचे सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचा प्रयत्न करतील.
नवीन वीज जोडणीसाठी इच्छुक असणार्‍या ग्राहकाला ओळखपत्र पुरावा म्हणून निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहनपरवाना, फोटोपास (शासन मान्यताप्राप्त छायाचित्रीत ओळखपत्र), खरेदी-विक्री कराराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, शासनाने दिलेले वरिष्ठ नागरिकाचे ओळखपत्र, यापैकी एक तसेच पत्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, स्थानिक करपावती, सक्षम शासकीय अधिकार्‍यांचा मंजूर नकाशा, घरमालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र (अर्जदार भाडेकरू असल्यास), शासनाने दिलेले मालमत्ता कार्ड किंवा सातबाराचा उतारा इत्यादीपैकी एक कागदपत्र महावितरणच्या कर्मचार्‍याकडे द्यावे लागणार आहे.

Web Title: Mahavitaran's door to door service for new power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.