४२ वीज चोरट्यांना महावितरणचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 07:03 PM2017-10-16T19:03:51+5:302017-10-16T19:08:01+5:30
वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी १२ ऑक्टोंबर २0१७ रोजी अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी १२ ऑक्टोंबर २0१७ रोजी अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तिनही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नूसार (थेट वीजचोरी) ४२ तर कल १२६ नुसार (वीजेचा गैरवापर) ३ अशा एकून ४५ जणांवर कारवाई करण्यात आली.
वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृ त्वाखाली कार्यकारी अभियंते डी.एम.मानकर व प्रमोद काकडे तसेच उपकार्यकारी अभियंते अधिकारी, कर्मचारी व जनमित्र असलेल्या पथकाने या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून व विद्युत वाहिन्यावर आकोडे/हुक टाकून थेट वीजचोरी करणार्यामध्ये अकोला शहर विभागअंतर्गत २६ जणांविरुद्ध, तर अकोट 0२ तर अकोला ग्रामीण विभागांतर्गत १४ अशा एकूण ४२ ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे 0३ ग्राहक आढळून आले त्यांचेवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यापूर्वीसूद्धा अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्ध तीने,सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.