महावितरणला ग्राहक मंचचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 02:08 AM2016-07-18T02:08:49+5:302016-07-18T02:08:49+5:30

जादा वीज देयक आकरणीसह ग्राहकास मानसिक मनस्ताप देणे भोवले!

MahaVitra band of customer platform! | महावितरणला ग्राहक मंचचा दणका!

महावितरणला ग्राहक मंचचा दणका!

Next

अकोला: वीज ग्राहकास अतिरिक्त वीज देयकासह दंड आकारून वीज जोडणी तोडल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचाने वीज महावितरण कंपनीला फटकारले असून ग्राहकास झालेल्या त्रासापोटी ५ हजार रुपयांचा दंड आकारला. हा निर्णय ग्राहक मंचाने बुधवार १३ जुलै रोजी दिला.
आकोट येथील वीज ग्राहक हसानंद जाधवाणी यांचा विजेचा वापर केवळ ५0 ते ८0 युनिट असताना, महावितरणने सप्टेंबर २0१५चे वीज बिल तब्बल ५१७ युनिटचे वीज देयक पाठवले. त्यासंबंधी तक्रार दाखल केली. मीटर नादुरुस्त असल्यामुळे अतिरिक्त वीज बिल आल्याची सबब देत वीज कंपनीने मीटर बदलून दिले. त्यानंतर त्यांना १९७ युनिटचे देयक देण्यात आले. त्यामध्ये १६४ युनिट पूर्वीच्या मीटरचे तर ३३ युनिट नवीन मीटरचे गृहित धरण्यात आले. त्यामुळे बिल दुरुस्तीसाठी पुन्हा तक्रार दिली. त्याकडे मात्र वीज कंपनीने पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यानंतर वारंवार तक्रार देऊनही कुठलीही कारवाई झाली नाही; मात्र ७ मार्च २0१६ रोजी रात्री अचानक त्यांच्या घरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर संपर्क साधल्यानंतर त्यांनी वीज देयकाचे अर्धे पैसे भरावयास सांगितले. त्यानंतर जाधवाणी यांनी दुसर्‍या दिवशी ६ हजार रुपयांसह पुनजरेडणीसाठी ५0 रुपयांचा भरणा केला. त्यानंतर पुन्हा २२ मार्च रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. लेखी तक्रार दिल्यानंतर रात्री ८ वाजताचा सुमारास पूर्ववत करण्यात आला. वीज कंपनीच्या या मनमानी कारभाराने व्यथित झालेल्या जाधवाणी यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. या सुनावणीमध्ये ग्राहक मंचाने सप्टेंबर-ऑक्टोबर २0१५च्या जादा देयक देण्याबाबत तसेच नियमबाह्य वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारावर ताशेरे ओढले. सप्टेंबर २0१५ पूर्वी व तसेच नवीन मीटर बसविल्यानंतर वीज देयकांनुसार त्यांचा विजेचा वापर ५0 ते ८0 युनिटच्या दरम्यान असल्यामुळे ५१७ तथा १९७ युनिटचे देयक जादा असल्याचे नोंदवून वीज वितरण कंपनीस ५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. त्याचसोबत ग्राहकाला झालेल्या नाहक मनस्तापासाठी १ हजार रुपयांचा दंड देण्यात आला. या दंडाची रक्कम दोषी कर्मचार्‍याच्या वेतनातून क पात करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी ग्राहकाची बाजू आशीष चंदराणा यांनी मांडली.

Web Title: MahaVitra band of customer platform!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.