महावितरण नाट्य स्पर्धा : अकोला परिमंडळाच्या ‘बाबा मी तुमचीच’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:38 PM2018-10-06T12:38:41+5:302018-10-06T12:40:02+5:30
अकोला: नागपूर येथे पार पडलेल्या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडलातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम क्रमांक पटकाविला.
अकोला: नागपूर येथे पार पडलेल्या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडलातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम क्रमांक पटकाविला. अमरावती परिमंडलाचे ‘ती रात्र’ हे नाटक उपविजेते ठरले. ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दोन दिवस चाललेल्या या नाट्य स्पर्धेत चंद्र्रपूर परिमंडलातर्फे अशोक बुरबुरे लिखित ‘आग्टं’, अमरावती परिमंडलातर्फे हेमंत एदलाबादकर लिखित ‘ती रात्र’, गोंदिया परिमंडलातर्फे प्रशांत दळवी लिखित‘चारचौघी’, अकोला परिमंडलातर्फे चंद्र्रकांत शिंदे लिखित ‘बाबा मी तुमचीच मुलगी आहे’ तर, नागपूर परिमंडलातर्फे दिपेश सावंत लिखित ‘ओय लेले’ या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी मंचावर महावितरणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नाट्य स्पर्धेचे कार्याध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर, अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे, उपव्यवस्थापक गुरुमितसिंग गोसल, जनसंपर्क अधिकारी विकास आडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन किशोर गलांडे यांनी, तर आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले. अकोला परिमंडळातील नितीन नांदुरकर, गणेश राणे, नूतन दाभाडे, ज्योती मुळे, संतोष पाटील यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
कर्तबगार कर्मचाऱ्यांचा सत्कार
आपल्या कार्यालयीन कामात विशेष योगदान दिलेल्या खामगाव येथे कार्यरत सहायक अभियंता शैलेश आकरे, कामठी येथील उपकार्यकारी अभियंता दिलीप मदने आणि वर्धा शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ मधू शिव या कर्मचाºयांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.