अकोल्यात 'जय महेश'च्या गजरात निघारी माहेश्वरी महिलांची साडी वॉकथॉन
By Atul.jaiswal | Published: June 8, 2024 08:06 PM2024-06-08T20:06:58+5:302024-06-08T20:07:15+5:30
ही साड़ी वाॅकथॉन 'जय महेश'चा जय घोष करीत माहेश्वरी भवन येथे पोहोचून तेथे समारोप करण्यात आला.
अकोला : अ. भा.माहेश्वरी महिला व विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठन अंतर्गत शनिवारी अकोला जिल्हा माहेश्वरी महिला संगठन व माहेश्वरी महिला मंडळाच्यावतीने महिलांची साड़ी वाॅकथाॅन काढण्यात आली. स्थानीक राम मंदिर पासून प्रारंभ झालेल्या या वाॅकथाॅन प्रसंगी महिलांनी भगवंतांची पूजा अर्चना करून वाकेथानच्या पोस्टरचे विधिवत विमोचन केले. यावेळी प्रमूख पाहुणे आरती लड्ढा, सुनीता राठी, डॉ. तारा माहेश्वरी, कल्पना भूतडा, निशा टावरी, शारदा लाखोटिया, ज्योती बियानी, हेमा खटोड, रचना लड्ढा, विजय पनपालिया, शांतिलाल भाला, विजय राठी, सागर लोहिया, प्रा. रमण हेड़ा, ॲड. विशाल लड्ढा, अनूप राठी, विनीत बियानी आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत ज्योत्सना तापड़िया, शकुंतला चांडक यांनी केले. राम मंदिर परिसरात उपस्थित सर्व अतिथी व महिलांचे आभार जिल्हा संगठनच्या उपाध्यक्ष ज्योती सारडा यांनी मानले. मातृशक्तीची ही साड़ी वाॅकथॉन 'जय महेश'चा जय घोष करीत माहेश्वरी भवन येथे पोहोचून तेथे समारोप करण्यात आला.
यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेची वेशभूषा रुचि मालपानी यांनी सुषमा स्वराजची वेशभूषा सुषमा चांडक यांनी, इंदिरा गांधीची वेशभूषा कीर्ति काबरा, कृतिका तापड़िया यांनी साकार केली. राजकुवरबाई लड्ढा यांच्या वतीने रामायणवर प्रश्न मंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यात आरती भूतडा,अर्चना रांदड, शशिकला खटोड़ शोभा भाला, दीपाली जाजू, शोभा बियानी, कीर्ति काबरा,अनीता गांधी,प्रेरणा चांडक, तारा अटल,पुष्पा लोहिया या अव्वल ठरल्या. साड़ी परिधान स्लोगन स्पर्धेत प्रथम प्रभा अटल, द्वितीय रेखा बियानी, तृतीय प्रेमल भट्टड आल्या. यामध्ये जवळपास २०० महिला सहभागी झाल्या होत्या. आयोजनात अकोला जिल्हा माहेश्वरी महिला संघटन च्या अध्यक्षा उषा बाहेती, माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा चांडक व समाज ट्रस्ट, युवा संघटनचा सक्रिय सहभाग राहिला, अशी माहिती अकोला जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या प्रचार मंत्री आरती पनपालिया यांनी दिली.