बार्शीटाकळी तालुक्यात ४० ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:04+5:302020-12-13T04:33:04+5:30

विझाेरा/सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील एकूण ८० ग्रामपंचायतींचे प्रवर्गानिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर महिला आरक्षण साेडत जिल्हाधिकारी कार्यलयात काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील ...

Mahilaraj in 40 gram panchayats in Barshitakali taluka | बार्शीटाकळी तालुक्यात ४० ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज

बार्शीटाकळी तालुक्यात ४० ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज

Next

विझाेरा/सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील एकूण ८० ग्रामपंचायतींचे प्रवर्गानिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर महिला आरक्षण साेडत जिल्हाधिकारी कार्यलयात काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार आहे. त्यानुषंगाने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

अनुसूचित जातीसाठी ६, अनसूचित जमाती ३, नामाप्र ११, सर्वसाधारण २० अशा ४० ग्रामपंचायती महिलासांठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रम घाेषित झाल्याने ग्रामीण भागात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. ज्या ठिकाणी महिला सरपंचपद राखीव आहे तेथील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनुसूचित जाती महिला राखीव: पार्डी, खेर्डा खु., गाेरव्हा, घाेटा, जमकेश्वर, पिंपळखुटा,

अनुसूचित जमाती महिला राखीव: परंडा, वाघजाळी, खांबाेरा, नामाप्र महिला राखीव: देवदरी, पुनोती खु., टिटवण, वाघा वस्तापूर, धानाेरा, बाेरमळू, मांगुळ, कासारखेड, भेंडी महाल, दगडपारव्हा, निंबी बु. सर्वसाधारण महिला राखीव: विझाेरा, महागाव भेंडी, पुनाेती बु., निहिदा, काेथळी खु., काजळेश्वर, दाेनद बु., चिंचाेली रुद्रायणी, साखरविरा, सावरखेड, जनुना, झाेडगा, धाकली, पाटखेड, पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, शेलू बु., अंजनी बु., जलालाबाद राखीव आहेत. तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये मांगूळ, निहिदा, काेथळी खु., खेर्डा बु., जमकेश्वर, दाेनद बु. यांचा समावेश आहे.

Web Title: Mahilaraj in 40 gram panchayats in Barshitakali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.