मूर्तिजापूर तालुक्यात ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:32+5:302020-12-12T04:35:32+5:30
---------------------------------------- मूर्तिजापूर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायत सरपंचपदाची मुदत संपुष्टात आली आहे. ८६ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण शासकीय गुदामात ८ डिसेंबर ...
----------------------------------------
मूर्तिजापूर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायत सरपंचपदाची मुदत संपुष्टात आली आहे. ८६ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण शासकीय गुदामात ८ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आले. महिला सरपंच आरक्षणाची सोडत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. दरम्यान, तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले आहेत.
यामध्ये ११ ग्रामपंचायत अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती, १२ नामाप्र, १९ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतपैकी २६ ग्रामपंचायतची मुदत ऑगस्टमध्ये संपल्याने यातील २६ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती, तर ३ ग्रामपंचायत सरपंचपदाची मुदत नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली असल्याने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. यातील २९ ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीचा एक भाग म्हणून मंगळवारी सरपंचपदाचे आरक्षण मूर्तिजापूर येथे तर महिला आरक्षण अकोला येथे पार पडले. २०११च्या जनगणनेनुसार येथील जातिनिहाय लोकसंख्या आधारावर २२ गावांची सरपंचपदे अनुसूचित जातीसाठी, ३ गावांची सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी, तर २३ नामाप्र आणि ३८ सर्वसाधारण अशी निश्चित करण्यात आली आहेत. महिलांचे विविध प्रवर्गातील आरक्षण शुक्रवारी अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत निश्चित झाले आहेत. अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव कवळा, नागोली, अनुसूचित जातीसाठी अकोली ज., अनभोरा, मंगरूळ कांबे, गोरेगाव, मुंगशी, बोर्टा, ब्रह्मी खुर्द, दताळा, पोही, दातवी, सालतवाडा, खोडद, नामाप्रसाठी कार्ली, धामोरी बु., बोरगाव निंघोट, सोनोरी (बपोरी), आरखेड, कोळसरा, वडगाव, शेलू बाजार, वीरवाडा, निंभा, रामटेक किनखेड व सर्वसाधारण गाझीपूर, जामठी बु, दापुरा, धानोरा (पाटेकर), बपोरी, भाटोरी, मधापुरी, मुरंबा, मोहखेड, लोणसणा, वाई (माना), शिवण खु., शेरवाडी, शेलू नजीक, सोनोरी (मूर्तिजापूर), सांगवा मेळ या ४४ ग्रामपंचायतीत महिलाराज असणार आहे.
---------------
निवडणुकीत २९ ग्रामपंचायतींचा समावेश
----------------------------
पारद, भटोरी, मंगरूळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपूर, कवठा (खोलापूर), सोनोरी (बपोरी), बपोरी, कुरूम, माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु, काली, राजुरा घाटे, खांदला, धानोरा (पाटेकर), निभा, विराहीत, मोहखेड, कंझरा, अनभोरा, जामठी बु, हातगाव, चिखली.