हाता ग्रामपंचायतवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:33 AM2021-02-06T04:33:04+5:302021-02-06T04:33:04+5:30
----------------------- गोरगरिबांना लाभ देण्याची मागणी निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर परिसरात प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचे सर्वेक्षण करून त्याचा गोरगरीब रुग्णांना ...
-----------------------
गोरगरिबांना लाभ देण्याची मागणी
निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर परिसरात प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचे सर्वेक्षण करून त्याचा गोरगरीब रुग्णांना लाभ द्यावा, अशी मागणी पिंजर ग्रामपंचायतीच्या सदस्य विजया गजानन गावंडे यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
----------------------
हरवलेला बैल केला परत
सावरा : वडनेर गंगाई येथील मो.मकसूद अ. सादिक यांचा बैल दि. ३१ जानेवारीला वडनेर गंगाई येथून हरविला होता. सावरा येथील शेतकरी गणेश कबाडे हे दर्यापूर रस्त्यावरील शेतात गेले असता त्यांना अनोळखी बैल दिसून आला. बैलमालकीचा नसल्याने त्यांनी ग्रामपंचायतकडे सुपुर्द केला. सावरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश काळपांडे यांनी बैलाच्या टॅग नंबरवरून वडनेर गंगाई येथील असल्याचे समजले. त्यांनी मो.मकसूद अ. सादिक यांच्याशी संपर्क साधित हरवलेला बैल परत केला. यावेळी पोलीसपाटील शिल्पा सपकाळ, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल गुप्ता, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश काळपांडे आदी उपस्थित होते. (फोटो)
--
कपाशीची उलंगवाडी; नांगरणीचे कामे सुरू
बोरगावमंजू : शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी सुरू केली असून, पुढील खरीप हंगामासाठी नांगरणीची कामे सुरू केली आहेत. ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशातच यंदा मजुरीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.