भाविकांचा मेटॅडोर उलटून एक ठार; १४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:28 AM2017-08-10T01:28:24+5:302017-08-10T01:28:36+5:30
बोरगाव मंजू : माहूरवरून परतणार्या व्याळा येथील भाविकांच्या मिनी मेटॅडोरला राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूनजीक ८ ऑगस्टच्या रात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये एक ठार, तर १४ जखमी झाले. सदर वाहन चालकाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : माहूरवरून परतणार्या व्याळा येथील भाविकांच्या मिनी मेटॅडोरला राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूनजीक ८ ऑगस्टच्या रात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये एक ठार, तर १४ जखमी झाले. सदर वाहन चालकाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील भाविक रक्षाबंधननिमित्त माहूर येथे यात्रेला गेले होते. १४ भाविक एमएच ३0 एव्ही 0५२0 क्रमांकाच्या मालवाहू मिनी मेटॅडोरने देवदर्शन करून व्याळा येथे परतीच्या मार्गावर होते. बोरगाव मंजूनजीकसदर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने तीन पलट्या खाऊन ते रस्त्याच्या बाजूला खाली पडले. या अपघातामध्ये पुरुषोत्तम श्रीदत्त दांगटे वय ५0 रा. व्याळा हे ठार झाले, तर १४ जण जखमी झाले.
जखमीमध्ये ज्योती राऊत (३0), निर्मलाबाई म्हैसने (५५), जिजाबाई इंगळे (५५), आशा नादरे (४५), कमलाबाई नारिंगे (५५), देवका इंगळे (४५), महादेव म्हैसने (५0), अवधूत वानखडे (५0), विनायक इंगळे (५0), राजू इंगळे (२0), दौलत राऊत (४0), जयश्री बराटे (३५), अमोल पाकदुने (१७), गायत्री राऊत (१३) या १४ जणांचा जखमीमध्ये समावेश असून, जखमींना उपचाराकरिता रात्रीच अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
यापैकी व्याळा येथील निर्मलाबाई म्हैसने, कमलाबाई नारिंगे, जयश्री बराटे, महादेव म्हैसने हे गंभीर जखमी आहेत.
सदर घटनेची फिर्याद दौलत राऊत यांनी दिल्यावरून बोरगाव मंजू पोलिसांनी वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याच्या कारणावरून चालकाविरुद्ध भादंविच्या ३३७, ३३८, ३0४, २७९, १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. वाहनासह चालक अजय वाकोडे यास ताब्यात घेतले.
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर ठाणेदार पी. के. काटकर, पोलीस कर्मचारी दीपक कानडे, प्रवीण वाकोडे, भागवत कांबळे, श्रीराम इंगळे यांनी मूर्तिजापूर येथील आपत्कालीन अँम्ब्युलन्स बोलावून जखमींना उपचाराकरिता पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर करीत आहेत.