आराेग्य अधिकाऱ्यांची सेवा कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:12+5:302021-07-07T04:23:12+5:30
राज्यात सुमारे १००० पेक्षा अधिक बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा ...
राज्यात सुमारे १००० पेक्षा अधिक बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणल्यास साहजिकच राज्यातील रुग्णांना वैद्यकीय सेवा कमी प्रमाणात उपलब्ध होतील. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सदरच्या काळात बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक देण्यात आली होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना सदर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. कोरोना काळातील कंत्राटी पदांवर सेवा बजाविणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासनाने नियमित सेवेत सामावून घ्यावे. अशी मागणी आमदार रणधीर सावरकर औचित्याचा मुद्धा सादर करताना केली आहे.
...........................
शाहू महाराज यंग ब्रिगेडच्या वतीने जिजाऊंना वंदन
अकोला : छत्रपती शाहू महाराज यंग ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ स्मृतिदिनी राजमातांना वंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी पांडुरंग बोर्डे साहेब, तर प्रमुख उपस्थितीमध्ये महादेवराव महल्ले, महादेवराव डोईफोडे, पराते साहेब, साहित्यिक पंजाबराव वर, सविता शेळके होते. यावेळी ज्योती गायकवाड, कमल गायकवाड, साधना डामरे, सविता शेळके, ऋषाली तळेगांवकर यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात केली.
.....................
दिव्यांग, अनाथ, निराधारांना धान्य वाटप
मूर्तिजापूर : जिल्हाभरात जवळपास तीनशे दिव्यांग, विधवा, अनाथ आणि निराधार, वृद्ध मायबाप यांना एक महिना पुरेल अशी अन्नधान्याची किट स्त्री शक्ती फाउंडेशन व सेवा इंटरनॅशनलतर्फे देऊन राजश्री बोलके यांनी त्यांच्या सासूबाई राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त समाजसेविका झिंगुबाई बोलके यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी आ. पिंपळे उपविभागीय अधिकारी डॉ. अभय सिंह मोहिते पाटील साहेब, तहसीलदार प्रदीप पवार साहेब, पंजाबराव वर, साहित्यिक घुगे बंधू, सूनबाई जयश्रीताई बोलके उपस्थित हाेते.
.....................
पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देशानुसार पदवी वितरण समारंभाचे आयोजन रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आभासी पध्दतीने संपन्न झाले. यावेळी बी.एस्सी. व एम.एस.एस्सी. रसायनशास्त्र या अभ्यासक्रमात विद्यापीठातून मेरीट आलेल्या विद्यार्थिनी यांना प्रातिनिधिक स्वरूपात पदवी बहाल करण्यात आली. समारंभाला प्राचार्य डाॅ. देवेंद्र व्यास, प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. विजय नानोटी होते, तर मंचावर पदवी वितरण समितीचे समन्वयक डाॅ. राजेश चंद्रवंशी व समन्वयक डाॅ. राजेंद्र रहाटगांवकर उपस्थित होते. यावेळी गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केलेल्या रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागातील गुणवंत विद्यार्थिनी कु. श्रध्दा हातगांवकर, कु. रोषनी ग्वालानी, कु. अंजली यादव, कु. कोमल ठाकरे व बी.एस्सी.मध्ये विद्यापीठात मेरीट असलेली विद्यार्थिनी कु. जानकी देशमुख यांच्यासह पदवी व पदव्युत्तर विभागातील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यात आली. संचालन डाॅ. आशिष सरप यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ. अंजली सांगोळे यांनी केले.
फाेटाे
....................