प्रमुख जिल्हा मार्गांनाही दुर्लक्षाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:35 AM2017-09-21T01:35:39+5:302017-09-21T01:35:39+5:30
अकोला : देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणवल्या जाणार्या रस्त्यांकडे मात्र विकासाच्या झंझावातात किती दुर्लक्ष केले जात आहे, याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील हजारो किमीच्या रस्त्यांची कामेच सुरू झाली नसल्याच्या माहितीतून पुढे येत आहे. जिल्हा परिषदेकडे १५00 किमी, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३७५ किमीपेक्षाही अधिक किमी रस्त्यांची निर्मिती होणे बाकी आहे. त्यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला जिल्हा रस्ते विकास योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ४७६६ किमीचे रस्ते निर्मिती अपेक्षित आहे. २00१ ते २0२१ या कालावधीतील विकास योजनेनुसार आतापर्यंत त्यापैकी जवळपास सर्वच रस्त्यांची कामे होणे अपेक्षित असताना जिल्हा परिषदेकडे असलेल्या तब्बल १४९५ किमीच्या रस् त्यांना अद्याप हातच लागलेला नाही.
जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्या रस्त्यांची जोडणी करण्यासाठी दमबाज पाठपुरावा केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे केवळ अकोला शहराला जोडणारा रस्ता आहे, म्हणजे झाले, या मानसिकतेत असलेल्या ग्रामस्थांना एका गावातून दुसर्या गावांना जोडणार्या रस्त्यांची गरज आहे, याची अद्याप गरज वाटलेली नाही. त्यामुळेच शासन, लोकप्रतिनिधी त्यांना माहिती नसल्याचा आनंद उपभोगत आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी ६२४ किमी आहे. त्यापैकी ३१६ किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने अस्तित्वात आणले, तर २४४ किमीचे रस्ते जिल्हा परिषदेने केले. त्यापैकी ६४ किमीच्या रस्त्यांना अद्याप हात लागलेला नाही. राज्य मार्गांची लांबी ७३४ किमी आहे, त्यापैकी बांधकाम विभागाने ६६३, तर जिल्हा परिषदेने २0 किमीचे रस्ते केले. त्यातील ४८ किमी रस्ते निर्मिती झालेली नाही. इ तर जिल्हा मार्गाची लांबी १0९४ किमी आहे, जिल्हा परिषदेने त्यापैकी ८३0 किमीची निर्मिती केली. २६३ किमी अद्यापही बाकी आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या तीनही प्रकारातील रस्त्यांपैकी ३७५ किमी रस् त्याची कामे मिसिंग आहेत. ती करण्यासाठी शासन, लोकप्र ितनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेची यंत्रणा किती सजग आहे, हे गेल्या काही वर्षातील नवीन कामांच्या वेगातून दिसून येत आहे.