आलेगाव-नवेगाव रस्त्याची थातूरमातूर डागडुजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:49+5:302020-12-07T04:13:49+5:30
संबंधित अधिकाऱ्यावर व सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून व अधिकाऱ्यांकडून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावण्यात ...
संबंधित अधिकाऱ्यावर व सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून व अधिकाऱ्यांकडून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावण्यात येत आहे.
काही दिवसातच रोड जैसे थे वैसे होण्याची शक्यता आहे. दरवर्षी आलेगाव ते नवेगाव मार्गे डोणगाव रस्त्याची डागडुजी करण्यात येते. मात्र खड्डे जैसे थे दिसतात. सदर कामाकरिता शासनाकडून सबंधित ठेकेदाराला लाखो रुपये देण्यात येतात. मात्र कंत्राटदार अणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सबंधित अधिकारी यांची मिलीभगतमुळे रस्त्याचे तीनतेरा वाजत आहेत. खड्डे बुजविताना थातूरमातूर डांबर व गिट्टीचा वापर करण्यात येत आहे. गिट्टीचे प्रमाणसुद्धा कमी आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरातील सर्व रोड व इतर कामे सबंधित अधिकारी यांच्या मार्फत एकाच कंत्राटदाराला देण्यात येतात. केवळ रस्ता दुरुस्तीचा देखावा निर्माण करण्यात येत असल्याने, वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.
फोटो: