‘काेराेना लस ग्रामीण भागात उपलब्ध करा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:27+5:302021-05-17T04:17:27+5:30
अकोला : कोरोना संसर्गाचा उद्रेक लक्षात घेता शासनाने कोविड १९ अंतर्गत लसीकरणाचे कार्य सुरू केले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ...
अकोला : कोरोना संसर्गाचा उद्रेक लक्षात घेता शासनाने कोविड १९ अंतर्गत लसीकरणाचे कार्य सुरू केले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील मोठा वर्ग या सुविधेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, ग्रामीण स्तरापर्यंत सदर लस उपलब्ध देण्याबाबत व्यवस्था करण्याची मागणी हाेत आहे.
-----------------------------------------
वृद्ध लाभार्थींना मानधनाची प्रतीक्षा
अकोला : कोरोना संकटात घरातच राहण्याच्या प्रशासनाच्या निर्देशांचे पालन सुरू आहे. अशावेळी कुटुंबात आर्थिक विवंचना वाढत आहे. शासनाने दिलेल्या योजनेचा आधार संकटकाळात मिळणे अत्यावश्यक असतानाही पालांदूर परिसरात निराधारांना योजनेचा निधी वेळेत मिळत नसल्याची ओरड होत आहे. हा लाभ लाभार्थींना वेळेत मिळावा, अशी मागणी आहे.
----------------------------------------------
अल्प मानधनावर राबतात राेजगार सेवक
अकोला : लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवकांची जबाबदारी आहे. पण त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांच्या मानधनात वाढ करावी.
----------------------------------------------