निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवा; आचारसंहितेची काटेकाेर अंमलबजावणी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:21 AM2021-09-18T04:21:06+5:302021-09-18T04:21:06+5:30
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या पूर्वतयारी कामाचा आढावा घेत, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवून, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी ...
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या पूर्वतयारी कामाचा आढावा घेत, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवून, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हा परिषदेचे १४ गट आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या २८ गणांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
३.७१ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क!
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येत असून, या निवडणुकीत १ लाख ७७ हजार ७०० स्त्री, १ लाख ९४ हजार १९ पुरुष, तर एक इतर असे एकूण ३ लाख ७१ हजार ७२० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रियेसाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट ८१, मूर्तिजापूर ८३, अकोला ८५, बाळापूर ७४, बार्शीटाकळी ४९ व पातूर तालुक्यात ३९ असे एकूण ४८८ मतदान केंद्र राहणार आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
..........................................................
६०७ मतदान केंद्राध्यक्ष,
१८२१ मतदान अधिकारी !
पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय नियोजन करून जिल्ह्यात ४४ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, मतदान प्रक्रियेसाठी ६०७ केंद्राध्यक्ष व १ हजार ८२१ मतदान अधिकारी असे २ हजार ४२८ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले असून, २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील तालुकास्तरावर हे प्रशिक्षण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
.................................................................................
आचारसंहिता अंमलबजावणीसाठी
जिल्हास्तरीय समिती स्थापन!
जिल्ह्यातील स्थापन करण्यात आली आहे. तालुकास्तरावर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, ईव्हीएम बद्दल जनजागृती करणे, उमेदवारांच्या खर्चाचा तपशील गोळा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
..............................................................
पोटनिवडणुकांमध्ये जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा ४ लाख रुपये आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा तीन लाख रुपये इतकी असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
..........................फोटो....................