सोयाबीन, मूग, उडिदाचा सर्व्हे करुन शेतकर्यांना नुकसानभरपाई द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:37 AM2017-09-05T01:37:16+5:302017-09-05T01:37:34+5:30
अकोला जिल्हयातील सोयाबीन पीक मोठय़ाप्रमाणात वांझ निघाले असून, अनेक ठिकाणची फुलोरा गळती झाली, किडींनी आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मूंग, उडीद पीक तर हातचे गेले आहे. या सर्व पिकांचा सर्व्हे करू न शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाचे निवेदन शेतकरी जागर मंचाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हयातील सोयाबीन पीक मोठय़ाप्रमाणात वांझ निघाले असून, अनेक ठिकाणची फुलोरा गळती झाली, किडींनी आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मूंग, उडीद पीक तर हातचे गेले आहे. या सर्व पिकांचा सर्व्हे करू न शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाचे निवेदन शेतकरी जागर मंचाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने शेतकरी आणखीच हतबल झाला आहे. यासंबधी तातडीने सर्वेक्षण करू न शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, जगदिश तायडे, रंगराव टके, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर सुलताने, उज्वल काळमेघ, नारायण मावळे, रमेशराव मांगटे, शिवाभाऊ टेके, प्रशांत गावंडे, विजय देशमुख, शेखअन्सार, ज्ञानेश्वर गावंडे, सैय्यद वासीफ, दिलीप मोहोड, किरण बोपटे, शिवाजीराव म्हैसने, मंगेश मांगटे, प्रशांत नागे आदी शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकार्यांनी जाणून घेतली समस्या
यावर्षी जिल्ह्यात अपुर्या पावसामुळे पिकाची वाढ योग्य प्रकारे न झाल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याचे चित्र जिल्हाभरात आहे तर मूंग, उडीद पीक हातचे गेले आहे. शेतकर्यांनी सोयाबीनीची झाडे जिल्हाधिकारी पाण्डेय यांना दाखविली. जिल्हाधिकारी यांनी शेतकर्यांच्या व्यथा समजून घेत योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले.