मलेरियाने घेतला युवतीचा बळी
By admin | Published: November 9, 2014 12:30 AM2014-11-09T00:30:22+5:302014-11-09T00:30:22+5:30
डेंग्यूच्या थैमानासोबतच आता मलेरियाचा धोका.
अकोला - शहरासह जिल्हय़ात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झालेला असतानाच आता मलेरियानेही डोके वर काढले आहे. सवरेपचार रुग्णालयात शनिवारी आकोट तालुक्यातील चिचपाणी येथील २२ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तिचा मृत्यू मलेरियाने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आता डेंग्यूसोबतच मलेरियानेही नागरिकांच्या मनात भीती आहे.
आकोट तालुक्यातील चिचपाणी येथील रहिवासी माधुरी प्रशांत भारसाकळे (२२) हिला काही दिवसांपूर्वी मलेरिया झाला होता. त्यामुळे तिला उपचारासाठी तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी तिचा मृत्यू झाला. डेंग्यूचे प्रचंड थैमान माजल्याने जिल्हय़ात आतापर्यंत डेंग्यूने १३ जणांचा बळी घेतला असून, आता मलेरियानेही एका युवतीचा मृत्यू झाला आहे. हिवताप विभाग व जिल्हा आरोग्य विभाग ठोस उपाययोजना करण्यास कुचकामी असल्याचे दिसून येत असून, ग्रामीण भागात आता डेंग्यूसोबतच मलेरियानेही पाय पसरले असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. माधुरी भारसाकळे हिचा मलेरियाने मृत्यू झाल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद. पुढील प्रकरण आकोट पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.