मलकापूर ग्रामपंचायतचे २ कोटींचे बिल थकीत

By admin | Published: May 22, 2014 07:02 PM2014-05-22T19:02:36+5:302014-05-22T19:38:15+5:30

कराचा भरणा करा अन्यथा जलसंकट

Malkapur gram panchayat's 2 crores bill was tired | मलकापूर ग्रामपंचायतचे २ कोटींचे बिल थकीत

मलकापूर ग्रामपंचायतचे २ कोटींचे बिल थकीत

Next

शिवर - जवळच्या मलकापूर ग्रामपंचायतीकडे महानगरपालिकेचे दोन कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी काळात बिलाची पूर्तता न झाल्यास गावकर्‍यांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. शहरालगतची महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या मलकापूरमध्ये अनेक ठिकाणी विकास निधीतून कामे सुरू आहेत. आतापर्यंत ग्रामस्थांनी आपल्याकडील थकीत असलेल्या कराचा भरणा केल्यामुळे ग्रामपंचायतच्यावतीने पाण्याची पाईपलाईन, नाली दुरुस्ती, डांबरीकरण व सांडपाणी व्यवस्था इत्यादी कामे केलीत. या ग्रामपंचायतची मोठी समस्या पाण्याची आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेले जलस्वराजचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या १५ दिवसांत पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी महानगरपालिकेचे थकीत बिल भरणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायतच्यावतीने वॉर्ड क्रमांक १ ते ६ मध्ये विविध कामे सुरू आहेत. काही कामे प्रस्तावित आहेत. या कामासाठी निधी अपुरा पडत असल्यामुळे विकास कामे मंदावण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Malkapur gram panchayat's 2 crores bill was tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.