पत्नीला जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 04:51 PM2020-01-31T16:51:04+5:302020-01-31T16:51:10+5:30
पत्नीने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविणाºया पतीला तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला: पत्नीने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविणाºया पतीला तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
गोरक्षण रोडवरील कैलास नगरात राहणारा आरोपी प्रदीप किसनराव भुुंबरकर(३५) हा व्यसनी आहे. तो नेहमीच पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागायचा आणि त्रास द्यायचा. २४ मे २0१८ रोजी आरोपी प्रदीप भुंबरकर याने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रदीपने पत्नी वर्षा भुंबरकर हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले आणि घरातून पळून गेला. वर्षा भुंबरकर ही जळालेल्या अवस्थेमध्ये आरडाओरड करीत बाहेर आली. आजुबाजूच्या लोकांनी तिला तातडीने सर्वोपचार रूग्णालयात भरती केले. खदान पोलिसांनी आरोपी प्रदीप भुंबरकर याच्याविरूद्ध भांदवि कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला. वर्षा ही गंभीररित्या भाजली होती. या प्रकरणात खदान पोलिसांनी तिची जबाब नोंदविला. जबाबामध्ये तिने पतीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचे सांगितले. उपचारादरम्यान वर्षा भुंबरकर हिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी पती प्रदीप याच्याविरूद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी घटनेचा तपास करून न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. यासोबतच आरोपीच्या सावत्र मुलीने सुद्धा आरोपीविरूद्ध साक्ष देत, माझ्या आईला वडीलांनी रॉकेल ओतून जाळल्याचे सांगितले. न्यायालयाने साक्ष व मृतक वर्षाचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने आरोपी प्रदीप भुंबरकर याला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोलीस उपनिरीक्षक संगीता रंधे यांनी केला होता. (प्रतिनिधी)