अज्ञात नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:34 IST2020-01-12T13:34:44+5:302020-01-12T13:34:50+5:30
सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले.

अज्ञात नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार
तेल्हारा: शहरातील एका चिमुकलीवर अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याची घटना ६ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी १० जानेवारी रोजी हे प्रकरण तेल्हारा पोलिसांकडे वर्ग केले आहे.
तेल्हारा शहरातील एका चिमुकलीने आईजवळ गुप्तांग दुखत असल्याचे सांगितले होते. तसेच तिला तापही आला होता. डॉक्टरांनी तिला सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे नेण्याचा सल्ला दिला. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी सिटी कोतवाली ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला होता. तेल्हारा पोलिसांनी घटनेचा रिपोर्ट व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून भादंवि कलम ३७६ (२) (१), ३५४, ३५४ (अ) आणि बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ कलम ७, ८, ३, (०), ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पो. नि. विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश देशमुख, पो.काँ. राजू इंगळे व गणेश सोळंके पुढील तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)