स्थानीक गुन्हे शाखेकडून मांडूळ सापास जिवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 05:28 PM2018-11-25T17:28:02+5:302018-11-25T17:28:09+5:30
अकोला - आकोट फेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपातापा रोडवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एका जखमी अवस्थेतील लाखो रुपये कीमतीच्या मांडूळ सापाला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री जिवदान दिले.
अकोला - आकोट फेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपातापा रोडवर असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ एका जखमी अवस्थेतील लाखो रुपये कीमतीच्या मांडूळ सापाला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री जिवदान दिले. सदर मांडून जातीचा साप जखमी अवस्थेत असून त्याला पोलिसांनी वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.
स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी एएसआय दिनकर बुंदे, पोलिस कर्मचारी संदीप काटकर, प्रमोद चव्हाण, ढोरे हे शनिवारी रात्री गस्तीवर असतांना त्यांना आपातापा रोडवरील विदयुत वितरण कंपनीच्या कार्यासमोर जखमी अवस्थेत मांडूळ जातीचा साप दिसला. पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. तसेच काही सर्पतज्ज्ञांच्या मदतीने हा साप पकडला. लाखो रुपये कीमतीचा मांडूळ जातीचा साप जखमी अवस्थेत असल्याने पोलिसांना संशय आला. मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणाºया टोळीच्या हातुनच सदरचा साप जखमी झाल्याचे पोलिस सुत्रांचे म्हणणे आहे. गंभीर जखमी असलेल्या या मांडूळ सापावर प्राथमिक उपचार करून अकोला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई स्थानीक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी केली.