महिलांसाठी सामाजिक वसा जोपासणाऱ्या ‘मनीषा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:42+5:302020-12-15T04:35:42+5:30

शीर्षक : महिलांसाठी सामाजिक वसा जोपासणाऱ्या ‘मनीषा’ कोट: तुम्हाला महिलांच्या वेदनांची जाणीव असली म्हणजे तुम्ही त्या वेदना, समस्या निकाली ...

'Manisha' cultivates social fat for women | महिलांसाठी सामाजिक वसा जोपासणाऱ्या ‘मनीषा’

महिलांसाठी सामाजिक वसा जोपासणाऱ्या ‘मनीषा’

Next

शीर्षक : महिलांसाठी सामाजिक वसा जोपासणाऱ्या ‘मनीषा’

कोट: तुम्हाला महिलांच्या वेदनांची जाणीव असली म्हणजे तुम्ही त्या वेदना, समस्या निकाली काढण्यासाठी मार्ग शोधता. त्यासाठी योग्य दिशेने सुरू केलेली वाटचाल आणी कुटुंबाची साथ मिळाली की सर्व काही शक्य होतं. अशावेळी आपल्याला राजकीय पार्श्वभूमी असो अथवा नसो, महिलांनी

सक्रिय राजकारणात जरूर यायला हवे. महिलांना राजकारणात काम करताना असंख्य अडचणी येतात. त्यावर मात करीत महिलांनी बदल

घडवायला हवा. ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. त्याचा अनुभव महापालिकेत सभापतीपदावर काम करताना येतो. भारतीय जनता पक्षाने दिलेली संधी, माहेश्वरी महिला मंडळात विदर्भ कार्यकारिणीच्या माध्यमातून मागील १५ वर्षांपासून सुरू असलेले सामाजिक कर्तव्य आजही कायम असून, पती रवींद्र भंसाली यांची मिळालेली भक्कम साथ भविष्यातही वाटचाल अशीच सुरू ठेवण्यासाठी

प्रेरणादायी आहे.

- मनीषा रवींद्र भंसाली सभापती, महिला व बाल कल्याण समिती महानगरपालिका अकोला

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील माहेर अन् अकोल्यातील सासरचे कुटुंब दोन्हींकडे समाजकारण आणि उद्योग-व्यवसायाची पार्श्वभूमी. भाऊ गिरीश भगवानदासजी लाहोटी यांनी अथक परिश्रमातून वाशिम येथे तिरुपती ग्रुपची उभारणी करीत वाशिम शहराच्या विकासात खारीचा वाटा उचलला आहे. दुसरीकडे पती रवींद्र भंसाली हे शहरातील यशस्वी व्यावसायिक. पश्चिम विदर्भात त्यांचा पोकलेन, जेसीबी मशीन भाडेतत्त्वावर देण्याचा मोठा व्यवसाय. घरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सकारात्मक वातावरणामुळे मनीषा भंसाली यांच्या समाजकारणाला चालना मिळाली.

लग्नानंतर पती रवींद्र यांनीही कधी रोकठोक केली नाही. त्यामुळेच माहेश्वरी महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवला आहे. मुलगी श्रद्धाने नागपूर येथील प्रख्यात ‘व्हीएनआयटी’तून आर्किटेक्टची पदवी प्राप्त केली आहे. श्रद्धाला गायनाची आवड असून, अनेक प्रतिष्ठित प्रतियोगितांमध्ये तिने बाजी मारली आहे, तर मुलगा संकेत नागपूर येथूनच रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. सिव्हिलचे शिक्षण घेत आहे.

भाजपने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला!

२०१७ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिली. राजकारणाचा कोणताही अनुभव

पाठीशी नसताना पती रवींद्र यांच्या साथीमुळे भाजपचा प्रस्ताव विन्रमतेने स्वीकारला. जुलै २०१९ मध्ये पक्षाने विश्वास दाखवत महापालिकेत महिला

व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी दिली. काम करण्याची संधी मिळाल्याने नव्या जोमाने कामाला लागल्याचे मनीषा भंसाली यांनी सांगितले. पक्षातून नेहमीच ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, सुहासिनीताई धोत्रे, गंगादेवी शर्मा, मंजूषाताई सावरकर, महापौर अर्चनाताई मसने, अर्चना शर्मा, माजी महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील कायम पाठीशी असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

जपतात सामाजिक दायित्व!

माहेश्वरी महिला मंडळाच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या अनाथ आश्रमात व वृद्धाश्रमात मदत केली जाते. शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांटची उभारणी केली. महिला व बाल कल्याण समितीद्वारे शहरातील गरजू, होतकरू व पात्र लाभार्थी महिलांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मनीषा भंसाली सतत प्रयत्नशील आहेत. गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप केल्यानंतर आता चारचाकी वाहन प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा मानस लवकरच तडीस नेणार असल्याचे मनीषा भंसाली यांनी सांगितले. तसेच प्रभागात रस्ते, एलईडी पथदिवे, नाल्या, पेव्हर ब्लॉकची कामे निकाली काढली असून, दोन उद्यानांची निर्मिती करीत वॉकिंग ट्रॅकसह ओपन जिम साहित्य लावले. प्रभागात तब्बल २५ ठिकाणी

दिशादर्शक फलक लावल्याचे त्या सांगतात.

योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यासोबतच क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याच्या उद्देशातून मनीषा भंसाली यांनी क्रीडा साहित्य, वर्गखोल्यांमध्ये पंखे, लाइट, स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी सायकल वाटप योजना, अपंग विद्यार्थ्यांना गरजू साहित्य, शुद्ध पाण्यासाठी आरओ मशीन, मुलींना हायजिन किट वाटपासह विविध

योजनांचा लाभ मिळावा,यासाठी मनीषा भंसाली कायम आग्रही आहेत. यासाठी प्रशासनाची सकारात्मक साथ मिळाल्यास उपेक्षित व गरजू विद्यार्थ्यांचे हित जोपासले जाईल, अशी भावना त्या व्यक्त करतात.

Web Title: 'Manisha' cultivates social fat for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.