शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी मानकर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:11+5:302021-01-21T04:18:11+5:30

मानकर यांना कायम ठेवण्याचा निर्णय १४ जानेवारी राेजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ज्याेती शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेनंतर ...

Mankar retains as Secretary of Shikshan Prasarak Mandal | शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी मानकर कायम

शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी मानकर कायम

Next

मानकर यांना कायम ठेवण्याचा निर्णय १४ जानेवारी राेजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

दिला.

ज्याेती शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेनंतर अध्यक्ष म्हणून उत्तमराव बळीराम जानोळकर तर सचिव म्हणून महादेव मानकर कार्यरत होते. परंतू अध्यक्ष उत्तमराव जानोळकर यांनी नोटीसव्दारे ३ फेब्रुवारी २००२ मध्ये सभा घेऊन सचिवपदावरुन महादेव मानकर तर सदस्यपदावरुन उर्मिला मानकर यांना कमी करुन सचिवपदी स्वतःच्या मुलगा प्रशांत जानोळकर याला व सदस्यपदी वसंत मापारे यांची निवड केली हाेती. याबाबतचा चेंज रिपोर्ट सहाय्यक धर्मादाय आयुक्त अकोला यांचेकडे सादर केला. परंतु २३ ऑक्टोबर २००७ रोजी सहायक

धर्मादाय आयुक्तांनी त्यांचा चेंज रिपोर्ट नामंजूर केला. अमरावती विभाग धर्मादाय सह आयुक्त यांनी २० मार्च २०१२ रोजी त्यांचा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर अध्यक्ष उत्तमराव जानोळकर यांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले. त्यावर न्यायालयाने २३ ऑगस्ट २०१९ रोजी महादेव मानकर यांच्या बाजूने निकाल देत उत्तमराव जानोळकर यांची याचिका खारीज केली. त्याविरोधात अध्यक्ष उत्तमराव जानोळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतू हे प्रकरण न्यायालयाने २० सप्टेंबर २०२० रोजी धर्मादाय सह आयुक्त अमरावती यांचेकडे फेरचौकशीकडे पाठविले. फेरचौकशीनंतर धर्मादाय सह आयुक्त अमरावती यांनी ६ जानेवारी २०२० रोजी याचिका नामंजूर केली. या निकालाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ जानेवारी २०२१ रोजी उत्तमराव जानोळकर यांची याचिका नामंजूर करीत ज्योती शिक्षण प्रसारक मंडळच्या सचिवपदी महादेव तुळशीराम मानकर व सदस्यपदी उर्मिला महादेव मानकर यांना

कायम ठेवण्याचा न्याय निवाडा केला.

Web Title: Mankar retains as Secretary of Shikshan Prasarak Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.